कुस्तीगीर विजय चौधरी अखेर झाला 'डीवायएसपी'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

या संदर्भात 'सकाळ'ने सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश आले. यामुळे विजय चौधरी यांच्या सायगाव (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चाळीसगाव - ट्रिपल महाराष्ट्र केसरी ठरलेल्या जळगाव जिल्ह्यातील विजय चौधरी यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्‍वासन उशीराने का होईना पूर्ण केले. विजय चौधरी यांना पोलिस खात्यात 'डीवायएसपी' पदावर नियुक्ती दिली आहे.

या संदर्भात 'सकाळ'ने सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश आले. यामुळे विजय चौधरी यांच्या सायगाव (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विजय यांना शासकीय सेवते सामावून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात अभिनंदनाचा ठराव मांडला होता. विजय यांना नोकरी मिळावी यासाठी त्यांचे वडील नथु चौधरी (पहेलवान) यांनी मंत्रालयाच्या अनेक चकरा मारल्या होत्या. दर मंगळवारी ते मंत्रालयात जात होते.

'सकाळ'ने वारंवार विजयच्या नोकरीचा प्रश्न लावून धरला होता. या सर्व प्रयत्नांना आज खऱ्या अर्थाने यश आले. या बातमीने विजयच्या गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
Web Title: Wrestler Vijay Chaudhary gets 'DYSP' post