शहर विकास आघाडीला पाठिंबा ही घोडचूक - आमदार डॉ. सतीश पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

पारोळा - नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने चिन्हावर निवडणुका न लढता शहर विकास आघाडीला पाठिंबा दिला. त्यामुळे पराभवाला सामोरे जावे लागले. शहर विकास आघाडीला दिलेला पाठिंबा ही आपली राजकारणात मोठी घोडचूक होती, अशा कबुली आमदार डॉ. सतीश पाटील यांनी आज येथे दिली.

पारोळा - नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने चिन्हावर निवडणुका न लढता शहर विकास आघाडीला पाठिंबा दिला. त्यामुळे पराभवाला सामोरे जावे लागले. शहर विकास आघाडीला दिलेला पाठिंबा ही आपली राजकारणात मोठी घोडचूक होती, अशा कबुली आमदार डॉ. सतीश पाटील यांनी आज येथे दिली.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हरिनाथ मंगल कार्यालयात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. माजी खासदार ॲड. वसंतराव मोरे अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार साहेबराव पाटील, माजी सभापती प्रकाश जाधव, उपसभापती चंद्रकांत पाटील, मनोराज पाटील, दिगंबर पाटील, दीपक पाटील, ॲड. माधुरी पाटील, नगरसेवक मनीष पाटील, हिरामण पाटील आदी प्रमुख पाहुणे होते. आमदार डॉ. पाटील म्हणाले, की पक्षाच्या नगराध्यक्षाने रात्रीत पक्षांतर केले. त्यामुळे सक्षम उमेदवार नव्हता. शिरुडेंनी ब्लॅकमेल केले म्हणून तो निर्णय घ्यावा लागला. त्यानंतर आठ दिवसांत शिरुडे विरोधकांच्या दारात गेले. पाळीव प्राणी देखील इतक्‍या लवकर निष्ठा बदलत नाही. त्यात माझा दोष काय? मी नेहमी कार्यकर्त्याला बळ देत आलो आहे. मोठा करीत आलो आहे. आज मला काही जण हुकुमशाह म्हणतात. मी हुकूमशाह नसून जमिनीवर आहे. मुळात कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन केले पाहिजे. पदाअगोदर आपण काय होता. आता काय आहेत ही मतभिन्नता बाजूला ठेवा. अजून कोणाचेही तिकीट निश्‍चित नाही. योग्य संधी व  वेळेची वाट बघितली पाहिजे. पक्षनिष्ठा ठेवा, इलेक्‍टेड उमेदवाराचे तिकीट निश्‍चित करू, मोदी लाटेतदेखील तुम्ही जनतेने निर्धार करून निवडून दिले. त्या सर्वांना माझा सॅल्यूट आहे. वीस वर्षापासून जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात आहे. परिवर्तन करायचे आहे. माजी आमदार चिमणराव पाटील माझ्यावर तोंडसुख घेत आहेत. मुळात त्यांच्याजवळचे चार नगरसेवक फुटून सत्तेत सामील झाले. माझ्यापेक्षा त्यांनी स्वतःचे घर सांभाळावे, कोणी गेल्याने कोणाला फरक फडत नाही. सत्ताधारी विरोधात वातावरण आहे. त्यांची संधी आपल्याला आहे. सर्वसामान्यांचा कामासाठी पंचायत समिती ही ताब्यात पाहिजे, म्हणून कार्यकर्त्यांनी पेटून उठले पाहिजे.

यावेळी भाजप आणि नोटबंदी यावरदेखील टीका केली.  यावेळी ॲड मोरे म्हणाले, की नोटबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेती व्यवस्था ही मोडकळीस आली आहे. कॅशलेश व्यवहार हा चुकीचा निर्णय आहे. तो आपल्या देशाला  परवडणारा नाही. मोदींनी अपेक्षा भंग केल्या आहेत.

त्यामुळे आपल्याला चांगले वातावरण असून आपले सर्व उमेदवार निवडून आणा यावेळी माजी आमदार पाटील, ॲड माधुरी पाटील, मनोराज पाटील, प्रकाश जाधव, दिगंबर पाटील, रोहन पाटील, पराग मोरे,चंद्रकांत पाटील, प्रा. संजय भावसार यांच्यासह इच्छुक उमेदवारांनी मनोगत व्यक्त केले. तालुकाध्यक्ष बाळू पाटील यांनी आभार मानले.

तालुकाध्यक्षांची उघड टीका
यात आमदार डॉ. पाटील व माजी खासदार ॲड. मोरे यांचा नामोउल्लेख टाळून माजी तालुकाध्यक्ष शांताराम पाटील यांनी दोघांवर उघड टीका केली. घरात तिकीट न देता कार्यकर्त्यांचा विचार करा, तिकीट देताना ‘टेस्टर लावून निष्ठा चेक करा,’ दहा हजारांत निष्ठा विकली जाते. इतर घेतात म्हणून तुम्हीपण घरचे घेऊ नका, विरोधींसोबत एकत्र बसून बिनविरोध करू नका, सन्मानाची वागणूक दया, अशी प्रतिक्रिया मंचावरून व्यक्त केल्याने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. थोडक्‍यात राष्ट्रवादीतही अालबेल नसल्याचे सूतोवाच यातून उमटले आहेत. 

Web Title: wrong decission for citi development aghadi support