परिस्थितीवर मात करून यशने मिळवले 87 टक्के गुण

विलास पगार
रविवार, 10 जून 2018

जुन्या सिडकोतील शिवाजी चौक येथील रवींद्र बाविस्कर यांचा मुलगा यश बाविस्कर यांनी दहावीच्या परीक्षेत 87 टक्के मार्क मिळवले आहे.यशचे वडील हे शिलाई काम (टेलरिंग)  करत असून आई ही घरीच काम करत असते. दहावीच्या  पूर्व परीक्षेला जात असताना रिक्षाचालकाने यशला धडक दिली आणि ऐन परीक्षेला दहा ते बारा दिवस बाकी असताना सदर घटना घडली.

सिडको (नाशिक) : सिडकोतील ग्रामोदय माध्यमिक विद्यालय शिवाजी चौक येथील विद्यार्थी यश रविंद्र बाविस्कर याने दहावीच्या परीक्षेत 87 टक्के गुण मिळवून खऱ्या अर्थाने प्रतिकूल परिस्थितीवर मात केली आहे.

जुन्या सिडकोतील शिवाजी चौक येथील रवींद्र बाविस्कर यांचा मुलगा यश बाविस्कर यांनी दहावीच्या परीक्षेत 87 टक्के मार्क मिळवले आहे.यशचे वडील हे शिलाई काम (टेलरिंग)  करत असून आई ही घरीच काम करत असते. दहावीच्या  पूर्व परीक्षेला जात असताना रिक्षाचालकाने यशला धडक दिली आणि ऐन परीक्षेला दहा ते बारा दिवस बाकी असताना सदर घटना घडली. परीक्षेच्या काही काळ आधीच ऑपरेशन करण्यात आले. यशच्या पायात सळई टाकून ऑपरेशन करण्यात आले.परीक्षा तोंडावर असताना त्याने हिम्मत हारली नाही एवढा मोठा प्रसंग घडूनही त्याने बोर्डाची परीक्षा देण्याचे ठरवले.तसेच त्याला त्याच्या घरच्यांचा मानसिक आधार दिला. पायाला संपूर्णपणे प्लास्टर होते त्याला साधा पाय टेकवने सुद्धा अवघड झाले होते.अशा परिस्थितीत त्याने परीक्षा केंद्रावर जाऊन बसता येत नव्हते म्हणून झोपून पेपर लिहिला.कोणाला या गोष्टीचा विश्वास नव्हता की तो पेपर लिहू शकेल कारण त्याच्या सोबत घडलेली घटना ही खूप अवघड होती.

यशच्या घरची परिस्थिती साधारण आहे वडील शिवन काम करतात आणि आई हि त्यात त्यांना मदत करते स्वतःचं घर ही नाही अशा हालाखीच्या परिस्थितीत शिकण्याची जिद्द त्याच्या अंगी होती.आणि यातच त्याने नाविन्यपूर्ण संपादन केली 87 टक्के गुण पाडून खऱ्या अर्थाने त्याने आपल्या परिस्थिती मात केली यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.अनेकांनी त्याच्या या यशाचे कौतुक केले. त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या शाळेतील शिक्षकांनी त्याचे अभिनंदन केले पुढे जाऊन यशला आर्किटेक व्हायचे आहे.साठी त्याच्या आईवडिल अपार कष्ट करीत आहेत.

Web Title: Yash Baviskar success story