येवल्यात ४ हजार पास,५०० नापास तर सरासरी निकाल ८९ टक्के

संतोष विंचु
रविवार, 10 जून 2018

येवला : दहावीच्या परीक्षेत तालुक्यातून तब्बल दोनशेवर विध्यार्थ्यांनी गुणांची नव्वदी पार करून ९८ टक्क्यांपर्यत झेप घेतली आहे. तर शाळांचा निकाल मात्र गेल्या वर्षीपेक्षा केवळ एक टक्का वाढला असून केवळ चारच शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तालुक्यातील ४८ माध्यमिक शाळांतून परिक्षेला बसलेल्या चार हजार ६६८ पैकी केवळ ४९८ विध्यार्थ्यानाच फेलचा शिक्का लागला आहे.

येवला : दहावीच्या परीक्षेत तालुक्यातून तब्बल दोनशेवर विध्यार्थ्यांनी गुणांची नव्वदी पार करून ९८ टक्क्यांपर्यत झेप घेतली आहे. तर शाळांचा निकाल मात्र गेल्या वर्षीपेक्षा केवळ एक टक्का वाढला असून केवळ चारच शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तालुक्यातील ४८ माध्यमिक शाळांतून परिक्षेला बसलेल्या चार हजार ६६८ पैकी केवळ ४९८ विध्यार्थ्यानाच फेलचा शिक्का लागला आहे.

अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोंविंदराव सोनावणे विद्यालयाची विध्यार्थिनी दिपाली जाधव हि ९५.४० टक्के गुण मिळवून तालुक्याच्या ग्रामीण भागातून सर्व केंद्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तालुक्याचा दहावीचा निकाल २०१६ मध्ये ९२ तर मागील वर्षी ८८.६० टक्के लागला होता, यंदा हाच निकाल ८९.३३ टक्के लागला आहे. परीक्षेला बसलेल्या विध्यार्थ्यातून १२३८ विध्यार्थी विशेष प्राविण्यासह तर १७७५ विध्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. दहावीनंतर विद्यार्थ्यांचा अकरावी विज्ञान शाखेकडे सर्वाधिक कल असून वानिज्यकडे सुमार तर कला शाखेकडे अत्यल्प ओढा असल्याचे चित्र यंदा पण आहे. तसेच पॉलिटेक्निककडे अनेक विध्यार्थ्यांचा ओढा असून अनेकांनी सुट्टीतच महाविद्यालये देखील निवडल्याचे चित्र आहे.

तालुक्यातील शाळांचा सरासरी निकाल असा 
गुरुदत्त विद्यालय, धामोडे, एसएनडी इंग्लिस मीडियम बाभुळगांव व डी.पॉल येवला (तिन्ही १००%),मातोश्री विद्यालय, अंदरसुल (९१.२७%), समता विद्यालय, सुरेगाव (८७.८०%), न्यू इंग्लिस स्कूल, उंदिरवाडी (९४.२३%),जनता विद्यालय, गवंडगाव (९३.२२%), मुक्तानद विद्यालय, बोकटे(९२%), बल्हेगाव विद्यालय (९४.४७%), जनता विद्यालय, देशमाने (९४.११%), जनता विद्यालय, मुखेड (९१.८५%),विवेकानंद विद्यालय, एरंडगाव (८५.९३%), न्यू इंग्लिस स्कूल, नगरसुल (९१.१८%), मा.वि.विद्यालय, राजापुर (९५.६२%), नूतन विद्यालय, ममदापूर (८०.७६%), धुळगाव विद्यालय (८७.५०%),पुण्यश्लोक विद्यालय, अनकाई (८८.७०%), संतोष विद्यालय, बाभुळगाव (९५.३८%), म.फुले विद्यालय, कुसूर (९०.६२%), भुलेश्वर विद्यालय, भुलेगाव (९२.५९%), जनता विद्यालय, पाटोदा (८५.१२%), तांदुळवाड़ी विद्यालय (८८.५०%), सावरगांव विद्यालय (९२.८५%),संत ज्ञानेश्वर विद्यालय,कातरणी (८७.९६%), सा.फुले विद्यालय, सोमठाण देश (९०%), जय योगेश्वर विद्यालय, शिरसगाव (७३.६८%),आदर्श विद्यालय, चिचोंडी (८९.८७%), राजा शिवाजी विद्यालय, ठाणगाव (९०.६२%), मुक्तानंद विद्यालय, येवला (८६.११%), एन्झोकेम हायस्कूल,येवला (८२.५१%),जनता विद्यालय,येवला (८६.६३%), एंग्लो उर्दू येवला (८४.५६%),गर्ल्स उर्दू येवला (९८.७१%), तळवाडे विद्यालय (९२%), संतोष विद्यालय, रहाडी (९५.१६%),भारम विद्यालय (८४.६१%), सरस्वती विद्यालय, सायगाव (९४.७९%),धामणगाव विद्यालय (८५%),सरस्वती विद्यालय, खरवंडी (९०.३२ %), जनता विद्यालय, अंगणगाव (६९.७०%),जनता विद्यालय, कुसमाडी (८८.२३%), जनता विद्यालय, निमगाव मढ (९६.४२%), नगरसूल आश्रमशाळा (८६.८४%), जनार्धन विद्यालय, सावरगाव (६३.१५%), शासकीय वसतिगृह बाभूळगांव (९१.४२%)

“दहावीच्या निकालाने ग्रामीण भागात गुणवत्ता पूर्ण शिक्षण,डिजिटल शाळा आदि गुण आत्मसात करून शाळा बदलत असल्याचे स्पष्ट केले आहे.विद्यार्थ्यांचा कल तंत्रशिक्षण तसेच सायन्स विभागाकड़े वाढल्याचे चित्र आहे.”
- गीतेश गुजराथी, प्राचार्य, मातोश्री तंत्रनिकेतन, धानोरा

Web Title: in Yeola, 4 thousand passes, 500 drops and the average result is 89 percent