पाणी, संपूर्ण कर्जमुक्ती देण्यासाठी विशेष ग्रामसभा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

येवला : पालखेड डाव्या कालव्याला सुटणाऱ्या आवर्तनातून पिण्याच्या पाण्यासाठी परिसरातील बंधारे भरून द्यावेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी बोकटे, देवळाणे, दुगलगाव येथील ग्रामस्थांची विशेष ग्रामसभा झाली. या वेळी ग्रामस्थांनी हात वर करून मागणीला समर्थन दिले. 

बोकटे येथील भैरवनाथ मंदिरात झालेल्या संयुक्त ग्रामसभेला येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांची उपस्थिती होती. मर्चंट बॅंकेचे संचालक अरुणबापू काळे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, राजेंद्र मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी मंदिराचे काम सुरू असल्याने कळस व इतर कामांसाठी मदत करण्याचा प्रस्ताव उपस्थितांसमोर ठेवण्यात आला असता, लागलीच सर्वांनी मनाचा मोठेपणा दाखवत लोकवर्गणी दिली. यामुळे मंदिरासाठी पाच लाख जमा झाले.

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करावा, तसेच पालखेड कालव्यातून नगरपालिकेला पिण्यासाठी पाणी येणार आहे, तेच पाणी पाटाने कोळगंगा नदीत सोडून बंधारे भरून द्यावेत, असा एकमुखी ठराव करण्यात आला.

शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून, तोच मृत्यूला जवळ करतो आहे. कारण सतत पडणारा दुष्काळ, नापिकी व पाऊस झाला तर शेतमालाला भाव नाही. आता तूर, कांदा, द्राक्ष मातीमोल भावाने विकले जात आहे. यामुळे शेतकरी जगला पाहिजे म्हणून शासनाला कर्जमाफीशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन श्री. काले यांनी केले.

सध्या भीषण पाणीटंचाई असल्याने जनावरे, पशु-पक्षी, माणसांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. धरणात साठा शिल्लक आहे. त्यामुळे शासनाने अंत न पाहता पाणी द्यावे, नाहीतर आंदोलन करावे लागेल, असा इशारा अरुण काळे यांनी दिला.

बोकटेचे सरपंच प्रताप दाभाडे, देवळाणेच्या सरपंच आम्रपाली जाधव, डॉ. शरद काळे, शिवाजी कोटमे, वाल्हू काळे, दुगलगावचे सरपंच विश्‍वनाथ मोरे, सखाहरी लासुरे, गोरख लासुरे, रामदास लासुरे, रावसाहेब लासुरे, रामचंद्र त्रिभुवन, भाऊसाहेब मोरे, विजय दाभाडे, राहुल काळे, केशव दाभाडे, सखाहरी दाभाडे, भाऊसाहेब मलिक, गोपीचंद दाभाडे, दीपक दाभाडे, पिंटू खामकर, विनोद दाभाडे व तिन्ही गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Yeola district farmers demands complete loan waiver