Municipal Election
sakal
शिरपूर: निवडणूक आली की मतदारांमधील काही गट कमालीचे सक्रीय होतात. पाच वर्षात एकदाच उमेदवार हाती आला आहे. तेव्हा वाहत्या गंगेत हात धुवून घ्या अशा विचारातून मग भलत्याच मागण्या पुढे येतात. याचाच अनुभव सध्या शिरपूर नगर परिषदेचे इच्छूक उमेदवार घेत आहेत. पर्यटनासाठी खर्च द्या, क्रिकेटचे साहित्य द्या, मंडळांना मदत द्या अशा मागण्यांनी भांबावलेले इच्छूक ‘यापुढे उमेदवारी करु की नको’ अशा द्विधा मनस्थितीत अडकले आहेत.