येवला - शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे हाल

येवला - शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे हाल

येवला - भावेंविण देव न कळे नि:संदेह, गुरुविण अनुभव कैसा कळे. या संत ज्ञानेश्वरांच्या अभगांची आठवण जिल्ह्यातील हजारो विध्यार्थ्यांचे पालक घेत आहेत. याला कारण म्हणजे जेथे त्यांचे पाल्य शिकताय तेथे अध्यापनासाठी गुरुजीच नाहीत. कुठे चार वर्गांना एकच तर कुठे अख्ख्या शाळेला एकच शिक्षक ज्ञानदानाचा यज्ञ तेवत ठेवण्याचा प्रयत्न करताय. जिल्ह्यात तब्बल २६८ शाळांना ५६२ शिक्षकांची कमरता असून यावर्षी शिक्षक मिळण्याची शक्यताच नाही. 

एकीकडे शिक्षण विभाग शाळाबाह्य मुले ठेवू नका, आठवीपर्यंत शिक्षण सक्तीचे या सारखे धडाकेबाज निर्णय घेत असताना जेथे विद्यार्थी शिकतात त्या शाळांना शिक्षक देण्याची मेहरबानी करत नसल्याचे चित्र सहा-सात वर्षांपासून जिल्ह्यात आहे. जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शाळा सुविधा, गुणवत्ता व सेमीचा दर्जा मिळवत मॉडेल झाल्या असल्याने इंग्रजी शाळांतून मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत येऊ लागली आहे. पण आपला मुलगा जिथे शिकतोय तेथे शिकवण्यासाठी गुरूच नसल्याने जिल्ह्यातील अडीचशेच्या वर शाळांमध्ये पालकांचा चिंतेचा विषय बनला आहे.
 विद्यार्थी वाढले अन शिक्षकांची कमी होत आहेत.

त्यातच शासनाने ऑनलाइन बदल्या केल्याने अनेक शाळा शिक्षकांच्या पसंतीस उरला नाही परिणामी बदल्यांत जिल्ह्यातील १८ शाळा शून्य शिक्षकी झाल्या. यात नांदगाव तालुक्यात १०,सुरगाण्यात ३, येवल्यात २, त्र्यंबकेश्वर, पेठ व इगतपुरी येथे प्रत्येकी १ अशा अठरा शाळांना शून्य शिक्षक असल्याचे वास्तव पुढे आले होते.अर्थात त्यावरही तात्पुरती मलमपट्टी करून उपाय शोधले गेले आहेत. शासनाने २०१० नंतर भरतीच न केल्याने रिक्त जागा वाढून

आकडा ५६१ पर्यंत जाऊन पोहचला आहे. बदल्यांच्या अधिकाराने केला घात पूर्वी जिल्हा परिषद स्तरावरून बदल्या होत असल्याने शाळेला गुरुजीच नाही असे प्रकार घडत नव्हते.शिवाय विध्यार्थी संख्येनुसार जिल्हा व तालुका स्तरावरून शाळांना शिक्षकांची उपलब्धता होत होती.आता बदल्या ऑनलाईन झाल्याने अनेक शाळांना एखादा शिक्षक मिळाला तर कुठे मिळालेच नाही.आता बदली प्रकिया संपल्याने व अधिकार नसल्याने अधिकारीही निपूटपणे याकडे पाहत आहेत.“मागील सात वर्षापासून आम्ही सातत्याने शिक्षक द्या असा टाहो फोडतोय पण अजूनही हि समस्यां सुटलेली नाही.जिल्हा परिषद शाळा कात टाकून पसंतीस उतरू लागल्या असतांना रिक्त जागांचे ग्रहण मात्र गुणवत्तेवर परिणाम करत आहे.यामुळे शासन स्तरावरूनच याचे उत्तर मिळावे.”
प्रवीण गायकवाड,सदस्य,पंचायत समिती,येवला

आकडे बोलतात..
-जिल्ह्यातील एकूण प्राथमिक शाळा -  ३३२५ 
-शिक्षण घेत असलेले विध्यार्थी - सुमारे २ लाख ६० हजार 
-शिक्षकांची मंजूर पदे - १०,३५४ 
-आजमितीस कार्यरत शिक्षक - ९७९१ 
-एकूण रिक्त पदे - ५६२

शिक्षकांचे तालुकानिहाय चित्र
तालुका - कार्यरत - रिक्त
नांदगाव - ५१३ - १२१
सुरगाणा - ६९७ - ८२
येवला - ६२५ - ६५
मालेगाव - ९८३ - ६२
चांदवड - ५३१ - ४८
निफाड - ८४७ - ४३
सिन्नर - ६६८ - ४५
सटाणा - ८८५ - २५
देवळा - ३६८ - १०
दिंडोरी - ७७७ - ५
इगतपुरी - ६८१ - ७
कळवण - ५७५ - ६
नाशिक - ४२३ - ८
त्रंबक - ६२० - २०
पेठ  - ४८१ - ८ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com