येवला - खरेदी विक्री संघाचे चेअरमन भागुनाथ उशीर यांचा अचानक राजीनामा

bhagunath-ushir
bhagunath-ushir

येवला - नाशिक जिल्हयात येवला खरेदी विक्री संघाच्या माध्यमातुन शासकिय आधारभूत किंमत योजना सर्वाधिक प्रभावशाली राबवून गेल्या १७ वर्षापासुन आर्थिकदृष्टया अडचणीत असणाऱ्या खरेदी विक्री संघाला उर्जित अवस्थेत आणून राज्यभरात प्रभावशाली कामकाजाची दखल घेतली गेलेले येवला खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भागुनाथ उशीर यांनी आपला चेअरमनपदाचा व व्हा. चेअरमन नाना शेळके यांनी व्हा. चेअरमनपदाचा राजीनामा संचालक मंडळाकडे दिला. 

पवार, अॅड. शिंदे, दराडे, बनकर, या तालूकास्तरिय राजकिय नेत्यांच्या सहमती मधुन सन २०१६ ला संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली होती. पहिल्या वर्षी बनकर गटाचे राजेंद्र गायकवाड यांना चेअरमन तर पवार गटाचे भास्कर येवले यांना व्हा. चेअरमनपदाची संधी मिळाली होती. सन २०१७ ला अॅड. माणिकराव शिंदे गटाचे भागुनाथ उशीर यांची चेअरमनपदी तर दराडे गटाचे नाना शेळके यांची निवड करण्यात आली होती. चारही प्रमुख नेत्यांच्या गटाला आर्वतन पद्धतीने चेअरमन व व्हा. चेअरमनपदाची संधी दिली जाणार असल्याच्या पार्श्वभुमीवर राजिनामा दिला गेला आहे.

भागुनाथ उशीर यांनी चेअरमनपदाच्या काळात संघाच्या कामकाजात अमालुग्र बदल घडवुन आणत प्रचंड मेहनत घेतली. नाशिक जिल्हयात शासकियआधारभ्रत किंमत योजना राबवतांना येवला खरेदी विक्री संघ जिल्ह्यात प्रथम आला असुन अनेक विविध प्रकारचे शेतमाल शासकिय आधारभुत किंमत खरेदी योजनेअंर्तंगत महाराष्ट्र राज्यातील निवडक अग्रस्थानी असलेल्या संघामध्ये येवला खरेदी विक्री संघाचा समावेश झाला आहे. त्यांच्या कामकाजाला शोशल मिडिया, प्रिंट मिडिया, टिव्ही चॅनलवरून प्रचंड प्रसिद्धी मिळाल्याने चेअरमन पदाची कारकिर्द चर्चित राहून सर्वपक्षीय नेतेमंडळींनी कामकाजाची दखल घेतली आहे.

नविन चेअरमनपदाची संधी या वेळस दराडे, किंवा पवार यांच्या राजकिय गटाकडे राहून व्हा. चेअरमनपद अॅड. शिंदे किंवा बनकर गटाकडे राहण्याची शक्यता आहे. आपलीच वर्णी लागावी यासाठी इच्छुक संचालक आपआपल्या गटनेत्यांकडे मोर्चेबांधणीच्या तयारीला लागले असले तरी माजी आमदार मारोतराव पवार, राष्ट्रवादी कॉग्रेस प्रदेश चिटणीस अॅड. माणिकराव शिंदे, आमदार किशोर दराडे, जेष्ठ नेते आंबादास बनकर यांच्या सहमतीमधूनच चेअरमन, व्हा. चेअरमनची निवड होणार हे निश्चित आहे.

येवला खरेदी विक्री संघ सक्षम झाला पाहिजे हि जेष्ठ नेते अॅड. माणिकराव शिंदे व सर्वपक्षीय नेत्यांची अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याचे समाधान आहे.
 - भागुनाथ उशीर, अध्यक्ष, खरेदी विक्री संघ येवला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com