येवला - उंदिरवाडीेत रंगला शाळा, शिक्षक विद्यार्थी गुणगौरव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

येवला : शिक्षण महोत्सवाचे आयोजन करून गुणवंत शाळा, शिक्षक व विद्यार्थी
गुणगौरवांचा राबविलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. यामुळे शिक्षकांना प्रोत्साहन व ऊर्जा मिळते. या उर्जेचा उपयोग जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या प्रगतीसाठी होतो असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे यांनी केले.

येवला : शिक्षण महोत्सवाचे आयोजन करून गुणवंत शाळा, शिक्षक व विद्यार्थी
गुणगौरवांचा राबविलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. यामुळे शिक्षकांना प्रोत्साहन व ऊर्जा मिळते. या उर्जेचा उपयोग जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या प्रगतीसाठी होतो असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे यांनी केले.

येथील पंचायत समिती सदस्य प्रविण गायकवाड यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने उंदिरवाडी येथे आज सोमवारी नागडे गणातील सर्व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, गुणवंत शाळा, आदर्श शिक्षक व विद्यार्थी गुणगौरव सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन सांगळे बोलत होत्या. माजी आमदार मारोतराव पवार, जेष्ठ नेते अॅड. माणिकराव शिंदे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती यतीन पगार, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक रायभान काळे, युवा नेते कुणाल दराडे, पंचायत समितीच्या सभापती आशाताई साळवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी माजी आमदार पवार यांनी शिक्षकांना प्रेरणादायी असा स्तुत्य असल्याचे सांगत शुभेच्छा दिल्या. जेष्ठ नेते अॅड. शिंदे म्हणाले की, आता गल्लो गल्ली इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरु झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये बालकाचे वय ६ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याला दाखल केले जात होते. मात्र आता वयाची दोन वर्षे पूर्ण न झालेली बालकेही नर्सरी, केजी मध्ये टाकुन त्यांचे बालपण हिरावण्याचे काम आजचे पालक व या शाळा करीत आहे. हे बालपण जपण्याचे काम जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा करीत आहे,असे शिंदे यांनी सांगितले. यावेळी सभापती पगार, काळे, दराडे आदींची भाषणे झाली.

यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. नागडे गणातील १८ शाळांना सन्मानचिन्ह व गौरवपत्र देउन सरपंच, मुख्याध्यापक, शिक्षकांचा गौरव करण्यात आला.तर बाळासाहेब आहेर, सिमा गायकवाड, वसंत निघुट, सुभाष विंचू, भाउसाहेब साळी, सुभाष जगझाप यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

व्यासपीठावर सभापती साळवे, गटविकास अधिकारी सुनील आहिरे, गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे,बाजार समिती संचालक मकरंद सोनवणे, सचिन कळमकर, उपनगराध्यक्ष सूरज पटणी, उंदिरवाडीचे उपसरपंच प्रशांत देशमुख 
तसेच सरपंच मोनिका चौधरी, सुवर्णा पाखले, सुवर्णा खोकले, मिराताई कापसे, समाधान वाव्हुळ, भारती भोरकडे, नामदेव माळी, सोनाली कोटमे, लिलाबाई नागरे, सुभाष वाघ, रुपेश वाबळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रविण गायकवाड यांनी केले. तर सूत्रसंचालन सिमा गायकवाड, नानासाहेब कुर्‍हाडे व योगिता मानकर यांनी केले.

Web Title: yewala undirwadi annual gathering felicitating students and teachers