चर्मकार समाजाच्या विकासासाठी तरुणांनी पुढे यावे : बबनराव घोलप

चर्मकार समाजाच्या विकासासाठी तरुणांनी पुढे यावे : बबनराव घोलप

सटाणा - शिक्षणाने समाज व देशाचा विकास होतो. चर्मकार समाजातील अनेक तरुण-तरुणी आज उच्चपदांवर नोकरीला असून, त्यांनी चर्मकार समाजाच्या विकासासाठी पुढे यावे. असे आवाहन राष्ट्रीय चर्मकार समाजाचे अध्यक्ष तथा राज्याचे माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी येथे केले. 

येथील राधाई मंगल कार्यालयात नाशिक जिल्हा राष्ट्रीय चर्मकार महासंघार्फे आयोजित समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून श्री. घोलप बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून बुलढाण्याचे उपजिल्हाधिकारी भुषण आहिरे, उपजिल्हाअधिकारी सौ.गौरी अहिरे, डॉ. किरण अहिरे, जिल्हा परिषद सदस्या नुतन आहेर, चर्मकार समाजाचे जिल्हाध्यक्ष खंडेराव गांगुर्डे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख दिलिप कानडे, विठ्ठल बर्वे, लालचंद सोनवणे आदी उपस्थित होते. श्री. घोलप म्हणाले, समाजातील पालकांनी आपल्या मुला-मुलींच्या लग्नाची घाई करू नये. गटई कामाला न लावता त्यांना शिकु द्यावे. मुलं चांगली शिकली तर ते उच्चपदावर नोकरी करून आईवडिलांचे तसेच समाजाचे नाव उंचावतात, असेही श्री. घोलप यांनी स्पष्ट केले.

उपजिल्हाधिकारी भुषण आहिरे व सौ. गौरी अहिरे यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यासाविषयी माहिती देऊन त्यात यशस्वी होण्यासाठी जिद्द, मेहनत व कठोर परिश्रम घेण्याचे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांना पायलट, आयएएस, आयपीएस बनन्यासाठी शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली. नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख व बागलाण अकेडमीचे संस्थापक आनंदा महाले यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अहिरे, नूतन आहेर, विसावे, खंडेराव गांगुर्डे आदींची भाषणे झाली. यावेळी चर्मकार समाजातील ११५ गुणवंत विद्यार्थ्यांचा संविधानाचे पुस्तक, ट्रॉफी, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देउन गौरव करण्यात आला. 

कार्यक्रमास ग्रामिण जिल्हाप्रमुख सिताराम जाधव, उपजिल्हाध्यक्ष भास्कर अहिरे, माजी उपनगराध्यक्ष भारत खैरनार, रामदास पठाडे, रोहीदास जाधव, सुभाष मेहंदळे, बागलाण तालुकाध्यक्ष पोपट अहिरे, नंदु पाटोळे, संतोष पाटोळे, बन्सी अहिरे, ग्रामीण महीला जिल्हाध्यक्ष भारती शिलावट, संगीता शेळके, मॉन्टी मथुरे, संतोष जाधव, अशोक डोंगरे, रमेश अहीरे, पृथ्वीराज पाथरे, सुभाष सुरंजे, छोटीराम पाथरे, नानाजी ठाकरे, संजय महाले ,माजी सैनिक संघटनेचे उत्तम भामरे, डॉ. बबन अहिरे, रविंद्र शिलावट, काशिनाथ अहिरे, गोरख अहिरे आदींसह समाजातील पालक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. महेंद्र अहिरे यांनी सुत्रसंचलन केले तर सिताराम जाधव यांनी आभार मानले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com