घरून पळून आलेले तिघे पालकांच्या स्वाधीन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

नाशिक - सतत तोच तो अभ्यास अन्‌ पालकांकडूनही त्याचसंदर्भात होणारी सततची विचारणा, या साऱ्याला वैतागून तिघांनी मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये जाऊन आपली जिवाची मौज करण्याच्या उद्देशाने घरातून पलायन केले. मात्र, पालकांनी त्याची माहिती थेट नाशिकच्या सरकारवाडा पोलिसात दिल्याने, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी सलग 12 ते 16 तास बसस्थानकावर येणाऱ्या प्रत्येक बसची तपासणी करून या तिघा अल्पवयीन मुलांना शोधण्यात यश मिळवले अन्‌ त्या मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. सरकारवाडा पोलिसांच्या या कामगिरीचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी कौतुक करून शाबासकीची थापही दिली. 

सरकारवाडा पोलिस ठाण्यामध्ये बुधवारी दुपारी खामगाव पोलिस ठाण्यातून फोन आला. खामगाव येथून तीन मुले नाशिककडे येणाऱ्या बसमध्ये बसली असून ती मुले पालकांना न सांगताच घरातून निघून आल्याचे सांगण्यात आले. तसेच, त्या मुलांचे छायाचित्रही पाठविण्यात आले. सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी एक पथक तयार करून, त्यांना शहरातील तीनही बसस्थानकांमध्ये प्रत्येक बसची तपासणी करण्याचे आदेश दिले. मध्यरात्री बुलडाण्याहून नाशिकमध्ये आलेल्या बसमधून हे तिघे अल्पवयीन उतरले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी नाशिक फिरायला आलो असल्याचे सांगताच, पोलिसांनी त्यांच्याकडील छायाचित्र पाहून हीच ती पलायन केलेली मुले असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांना सरकारवाडा पोलिसात आणले आणि आम्ही फिरवतो नाशिक असे गमतीने सांगितले. सदरच्या मुलांची माहिती तत्काळ खामगाव पोलिस व त्यांच्या पालकांना देण्यात आल्यानंतर तेही नाशिकमध्ये आपल्या पाल्यांना घेण्यासाठी आज दाखल झाले. 

Web Title: Younger kids find success