तुमचा लढा मतांसाठी, आमचा लढा पाण्यासाठी!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

दुसरीकडे मात्र जनसामान्यांचा पिण्याच्या पाण्यासाठी लढा सुरू आहे. माळमाथा परिसरातील खुडाणे (ता.साक्री) गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत होती. 

निजामपूर-जैताणे (धुळे) : सद्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उमेदवारांसह नेतेमंडळी घरोघरी, दारोदारी जाऊन मतदारांकडे मतांचा जोगवा मागताना दिसून येत आहेत. दुसरीकडे मात्र जनसामान्यांचा पिण्याच्या पाण्यासाठी लढा सुरू आहे. माळमाथा परिसरातील खुडाणे (ता.साक्री) गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत होती.

त्यामुळे ग्रामपंचायतीने अठरा ते वीस लाखाची तात्पुरती पाणीपुरवठा योजना आखून त्याअंतर्गत सुमारे साडेचार किलोमीटर अंतरावरील 'घटबारी' बांधाशेजारी विहीर खोदून पीव्हीसी पाईपलाईनद्वारे यशस्वीरित्या गावविहिरीपर्यंत पाणी आणले आहे. सरपंच कल्पनाबाई गवळे, उपसरपंच नामदेव माळी, युवा कार्यकर्ते पराग माळी, माजी सरपंच धनराज माळी आदींसह ग्रामस्थांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

Web Title: Your fight for Vote We fight for water