विजेचा शॉक बसून तरूणाचा जागीच मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 मे 2018

यावल : तालुक्यातील हिंगोणे येथून लग्नाचे वऱ्हाड घेवून जात असलेल्या ट्रकच्या छतावर बसलेल्या युवकाच्या गळ्यात रस्यावरून गेलेली विजतारापैकी अर्थींगची तार अडकल्याने अविनाश तायडे या अठरा वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर चाळीस वर्षीय इसम गंभीर जखमी झाला. ही घटना आज़ सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान हिंगोणा-भालोद रस्त्यावर हिंगोण्यापासुन सुमारे दिड किलोमीटवर घडली आहे. या दुर्दैवी घटनेने हिंगोणा गावावर शोककळा पसरली असून लग्नमंडपी दुखःचे सावट पसरले आहे.

तालुक्यातील हिंगोणे येथील अनिकेत वसंत तायडे या युवकाचे (वाकोद ता. जामनेर ) येथे आज मंगळवारी सायंकाळी चार वाजेच्या लग्नासाठी ट्रकव्दारे हिंगोण्यावरून सकाळी अकरा वाजेच्या सुमारास वऱ्हाड निघाले होते. भालोद- भुसावळमार्गे जामनेर वाकोद येथे जाण्यास  निघाले होते घरापासून अवघ्या पाच -सात मिनीटाच्या अंतरावर हिगोणा -भालोद रस्त्यावर सुमारे दिड किलोमीटरवर रस्त्यास  आडवी गेलेल्या विजेच्या तारापैकी अर्थींगची तार  युवकाच्या गळ्यात अडकल्याने  अविनाश जगन्नाथ तायडे ( वय १८ ) याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर संतोष बळीराम तायडे (वय४० वर्षे )हे जखमी झाले आहेत. जखमीवर हिंगोणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.तर मयत अविनाश तायडे यास येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहे.

या घटनेने लग्नमंडपी दुखःचे सावट पसरले आहे. अविनाश हा दहावी उत्तीर्ण होऊन शेतमजुरी करून कुटूंबाचे  पालनपोषण करायचा त्याचे  पच्छात आई-वडील, एक भाऊ,दोन बहिनी असा परीवार आहे. अविनाशच्या अपघाती निधनाची वार्ता कळताच त्याच्या आईसह कुटुंबियांनी रुग्णालय आवारात आक्रोश केला.

Web Title: youth dead on electricity shock in Yaval

टॅग्स