धुळवडीच्या रंगधुंदीने घेतला तरुणाचा बळी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

जळगाव - धुळवड म्हणजे रंगात रंगूनी बेधुंद होऊन आनंद साजरा करण्याचा उत्सव... या उत्सवातील रंगधुंदीने आज शहरातील सिंधी कालनीत श्‍याम अहुजा या 42 वर्षीय तरुणाचा बळी घेतला. रंगांच्या उधळणीत दंग झालेला हा तरुण गच्चीवरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू ओढवला. ही घटना आज दुपारी दोनच्या सुमारास घडली. गच्चीवर शॉक लागून तोल गेल्याने श्‍याम खाली पडल्याचा अंदाज असून, त्या अनुषंगाने तपास सुरू आहे.

सिंधी कॉलनी येथील रहिवासी श्‍याम परमानंद अहुजा हे सिंधी कॉलनी परिसरातील मित्रमंडळ कुटुंबासह धुळवडीचा आनंद घेत होते. यातच दुपारी दोनच्या सुमारास रंग खेळत असताना चक्कर येऊन गच्चीवरून खाली कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. श्‍याम यांच्या उजव्या हाताच्या दोन बोटांवर विद्युत झटका लागल्याचे व्रण होते. त्यामुळे गच्चीवर रंग खेळत असताना शॉक लागून ते खाली पडल्याचा अंदाज आहे. खाली पडल्यावर माजी नगरसेवक अशोक मंधान, टिकमदास तेजवाणी आदींनी तत्काळ त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले. मात्र, तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत औद्योगीक वसाहत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. श्‍याम अहुजा यांचे गणेश मार्केट येथे होलसेल होजिअरीचे दुकान असून, दोन मुले एक मुलगी पत्नी असा परिवार आहे. कुटुंबाचा कर्ता पुरुष गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: youth death in dhulwad