कामटवाड्यातील युवकाचा कश्‍यपी धरणात बुडून मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

नाशिक - मित्रांसोबत कश्‍यपी धरणावर पोहण्यासाठी गेलेल्या सिडकोतील 20 वर्षीय युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रशांत प्रभाकर तायडे (वय 20, रा. नाशिक) असे युवकाचे नाव असून, तो बीएस्सी वाइन टेक्‍नॉलॉजीच्या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होता. ही घटना रविवारी (ता. 6) सायंकाळी घडली होती, तर मृतदेह सोमवारी सकाळी हाती लागला. प्रशांत हा सिडकोतील पाटीलनगर येथील गार्गी इन्स्टिट्यूट ऑफ वाइन टेक्‍नॉलॉजी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. काल त्याचे कुटुंबीय लग्नानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यामुळे घरी एकटा असताना प्रशांत पाच मित्रांसोबत पोहण्यासाठी कश्‍यपी धरणावर गेला होता.

नाशिक - मित्रांसोबत कश्‍यपी धरणावर पोहण्यासाठी गेलेल्या सिडकोतील 20 वर्षीय युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रशांत प्रभाकर तायडे (वय 20, रा. नाशिक) असे युवकाचे नाव असून, तो बीएस्सी वाइन टेक्‍नॉलॉजीच्या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होता. ही घटना रविवारी (ता. 6) सायंकाळी घडली होती, तर मृतदेह सोमवारी सकाळी हाती लागला. प्रशांत हा सिडकोतील पाटीलनगर येथील गार्गी इन्स्टिट्यूट ऑफ वाइन टेक्‍नॉलॉजी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. काल त्याचे कुटुंबीय लग्नानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यामुळे घरी एकटा असताना प्रशांत पाच मित्रांसोबत पोहण्यासाठी कश्‍यपी धरणावर गेला होता. पाण्यात पोहताना प्रशांतला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो पाण्यात बुडाला. 

Web Title: youth drowned in Kashyapi dam