मुलांना भेळ देऊन पोहायला उतरलेल्या पित्याचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

जळगाव - रामेश्‍वर कॉलनीतील नरेंद्र सुरेश तायडे (वय 35) यांचा मेहरुण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी दोनच्या सुमारास घडली. ते शनिवार सुटीचा दिवस असल्याने मुलांना मेहरुण तलावावर फिरायला घेऊन गेले होते. मुलांना भेळ खायला घेऊन देत नरेंद्र स्वतः तलावात पोहायला उतरले आणि बराच वेळ उलटूनही परत येत नसल्याने मुलाने आरडाओरड केली. थोड्या वेळाने आईला दूरध्वनीवरून संपर्क करून घटना कळविल्यानंतर धावपळ उडाली. पोलिसांनी पट्टीचे पोहणारे बोलावून एक तासाच्या परिश्रमाअंती मृतदेह बाहेर काढण्यात आला. 

रामेश्‍वर कॉलनीतील रहिवासी नरेंद्र सुरेश तायडे वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शनिवार सुटीचा दिवस असल्याने नरेंद्र यांनी मुलगा शुभम आणि दत्तक मुलगी खुशी यांच्यासह मेहरुण चौपाटीवर छोटेखानी "पिकनिक'चा बेत आखला. तिघेही चौपाटीवर आल्यानंतर थोडावेळ फिरून नरेंद्र यांनी दोघांना भेळ घेऊन दिली. दोन्ही मुले काठावर भेळ खात असताना नरेंद्र यांना मेहरुण तलावात पोहण्याचा मोह सुटला. त्यांनी तलावात उडी घेतली. काही वेळ पोहल्यानंतर ते दिसून येत नाहीत, म्हणून मुलगा शुभमने जवळ जाऊन हाका मारल्या. मात्र, तरी पप्पा येत नाहीत म्हटल्यावर मदतीला आरडाओरड सुरू करीत त्याला रडू कोसळले. चौपाटीवरील प्रत्यक्षदर्शींनी धाव घेत पोलिसांना कळविले. पट्टीच्या पोहणाऱ्यांना बोलाविण्यात आले. एक-दीड तासाच्या परिश्रमाअंती नरेंद्र तायडे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. ते पाहून मुलांसह कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. 

तलावातून बेसुमार उपसा 
मेहरुण तलावातून गाळ उपसण्याच्या नावाखाली बेसुमार मुरूमचा उपसा करण्यात आला आहे. पोकलॅंडद्वारे मुरूम मिळेल तेथे मोठ्या खदानी तलावाच्या तळाशी खोदण्यात आल्याने पाणी भरल्यावर तलावाच्या खोलीचा अंदाज चुकतो आणि पोहणाऱ्यांना जिवाशी मुकावे लागते, असे मृतदेह बाहेर काढणाऱ्यांनी सांगितले. 

पोहणाऱ्यांचे कसब पणाला 
माणूस बुडाल्याचे कळताच तलावाजवळील राजू शेजवड, विजय शिंदे, प्रकाश पारधी, अफजल खान या तरुणांनी शोधण्याचा प्रयत्न केला; परंतु मृतदेह सापडत नसल्याने पट्टीचे पोहणारे विकारोद्दीन मिस्बाउद्दीन पिरजादे यांनी पोहणाऱ्यांना काही माहिती दिली आणि दहाव्या मिनिटाला नरेंद्र तायडेंचा मृतदेह बाहेर काढला. त्यांना सोबत शकिलोद्दीन, रिझवान यांचीही मदत मिळाली.

Web Title: youth drowned in the meharuna lake

टॅग्स