थ्रेशरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

जळगाव - ममुराबाद शिवारातील खेडी खुर्द (ता. जळगाव) येथे शेतात सोयाबीन काढताना हात थ्रेशरमध्ये अडकून थेट कंबरेपर्यंत ओढला गेल्याने भिकन ऊर्फ भिका सुभाष वाघुळे (वय 27) याचा मृत्यू झाला. ही घटना इतकी भीषण होती, की वेगात फिरणाऱ्या थ्रेशरमध्ये या तरुणाच्या हातासह चेहरा व डोक्‍याचाही अक्षरशः चेंदामेंदा झाला. जिल्ह्यात थ्रेशरमध्ये अडकून मृत्यू झाल्याची या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.

घटनास्थळ गावापासून दूर असल्याने मदत पोचण्यासही उशीर झाला. पोलिसांच्या अथक परिश्रमांनी अडीच तासांनंतर तरुणाचा अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. ममुराबाद खेडी खुर्द (ता. जळगाव) येथील प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर प्रताप पाटील यांच्या शेतात सोयाबीन काढणीचे काम सुरू होते. सुनील भागवत वाघुळे-पाटील यांच्या ट्रॅक्‍टरवर त्यांचा चुलत भाऊ भिकन वाघुळे सोयाबीन काढणीचे काम करीत होता. सकाळी आठला काम सुरू केल्यानंतर काही वेळातच भिकनचा उजवा हात थ्रेशरमध्ये अडकला. काही कळण्याआधी त्याचे शरीर कंबरेपर्यंत ओढले गेले. शेतमजुरांनी मदतीसाठी आरडाओरड करून गावात घटना कळवली. मात्र, तोपर्यंत भिकनच्या शरीराचा अक्षरशः चुराडा झाला होता.

Web Title: Youth stranded in the Thresher death

टॅग्स