गोदावरी नदीत उडी घेत प्रियकराने संपविली जीवनयात्रा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जुलै 2019

दोघांच्या घरच्यांना एकमेकांवर प्रेम असल्याचे माहीत असतानादेखील आपसातील किरकोळ वादात प्रियकराने रविवारी (ता. ७) मुंबई- आग्रा महामार्गावरील कन्नमवार पुलावरून सायंकाळच्या सुमारास गोदावरी नदीत उडी घेत जीवनयात्रा संपविली. त्यात उडी मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रेयसीला नागरिकांनी वाचविले.

म्हसरूळ - दोघांच्या घरच्यांना एकमेकांवर प्रेम असल्याचे माहीत असतानादेखील आपसातील किरकोळ वादात प्रियकराने रविवारी (ता. ७) मुंबई- आग्रा महामार्गावरील कन्नमवार पुलावरून सायंकाळच्या सुमारास गोदावरी नदीत उडी घेत जीवनयात्रा संपविली. त्यात उडी मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रेयसीला नागरिकांनी वाचविले. 

प्रेम विजय शिंदे (वय २०, रा. स्वामी समर्थनगर, नांदूरगाव, औरंगाबाद रोड) असे गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या करणाऱ्या प्रियकाराचे नाव आहे. त्याचे एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेम प्रकरणाची दोन्ही कुटुंबास माहिती होती. दोन दिवसांपूर्वी दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाले होते. रविवारी (ता. ७) या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. दोघेही आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दुचाकीवर कन्नमवार पुलावर आले. या ठिकाणी सुरवातीला प्रेम शिंदे याने पुलावरून उडी मारली, तर प्रेयसी उडी मारण्याच्या प्रयत्नात असतानाच रिक्षाचालक व पादचाऱ्यांनी अटकाव करीत तिचे प्राण वाचविले. या घटनेची माहिती समजताच पंचवटी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. उडी घेतलेल्या प्रेमचा गोदावरी नदीत शोध घेण्यास सुरवात केली. मात्र, पाणीपातळी वाढत असल्याने त्याचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Suicide in Godavari River