व्यसनांबरोबरच आजचे तरुण इंटरनेट, मोबाईलच्या आहारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

धुळे : आजचा महाविद्यालयीन युवक केवळ धूम्रपान, मद्यपान किंवा मादक पदार्थांच्या व्यसनाने ग्रस्त झालेला नसून, तो टीव्ही, इंटरनेट व अँड्रॉइड मोबाईलच्या आहारीही गेला आहे. त्यामुळे राष्ट्रशक्‍तीची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. ती टाळण्यासाठी युवकांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन दिनकर पाटील यांनी केले. 

येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयात नुकतेच व्यसनमुक्ती शिबिर झाले, त्यावेळी श्री. पाटील बोलत होते. विद्यावर्धिनी गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य प्रा. अनिल दामोदर अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. डी. एस. सूर्यवंशी, उपप्राचार्य डी. एस. गावंडे, प्रा. व्ही. के. पवार, प्रा. एम. एल. पाटील, आशा फाउंडेशनचे जिल्हा प्रतिनिधी धीरज पाटील, पी. ओ. व्यास उपस्थित होते. यावेळी शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
 
पाटील म्हणाले, की अनेक तरुण गुटख्यासारख्या व्यसनाने ग्रस्त आहेत. त्यामुळे चारित्र्य, शरीर व आरोग्य संवर्धनाकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. व्यसनामुळे होणाऱ्या हानीची त्यांना पर्वा नाही. व्यसनांच्या दुष्परिणामांकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रा. दामोदर, प्रा. बाळासाहेब गणपाटील यांनीही मार्गदर्शन केले. डॉ. मंगेश पाटील, प्रा. जे. एस. शहा, प्रा. निलेश पाटील उपस्थित होते. प्रा. डॉ. देवेंद्र विसपुते यांनी परिचय करून दिला. कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत लगडे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

Web Title: youths stray with internet, mobile