जिल्हा परिषदेच्या अभियंत्यावर अपसंपदेचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

नाशिक जिल्हा परिषदेतील शाखा अभियंता जयवंत देशमुख यांच्याकडे गुप्त चौकशीतून उत्पन्नापेक्षा अधिक बेहिशोबी मालमत्ता आढळून आल्याचे निष्पन्न झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या फिर्यादीनुसार, त्यांच्याविरोधात अपसंपदेचा गुन्हा गंगापूर पोलिसात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जयवंत देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. 

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेतील शाखा अभियंता जयवंत देशमुख यांच्याकडे गुप्त चौकशीतून उत्पन्नापेक्षा अधिक बेहिशोबी मालमत्ता आढळून आल्याचे निष्पन्न झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या फिर्यादीनुसार, त्यांच्याविरोधात अपसंपदेचा गुन्हा गंगापूर पोलिसात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जयवंत देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. 

संशयित जयवंत प्रल्हाद देशमुख (वय 56, रा. फ्लॅट नं. 4, अंकिता अपार्टमेंट, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक) हे 20 मे 1986 ते 31 मार्च 2009 या कालावधीत नाशिक जिल्हा परिषदेमध्ये शाखा अभियंतापदावर कार्यरत होते. या कालावधीमध्ये त्यांनी शासकीय नोकरी करीत असताना, 16 लाख 67 हजार 415 रुपयांच्या बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचे समोर आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार आल्यानंतर महासंचालक कार्यालयाकडून संशयित देशमुख यांची गुप्त चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुप्तपणे चौकशी करण्यात आली होती. या चौकशीमधून संशयित देशमुख यांच्याकडे उत्पन्नापेक्षा जास्त बेहिशोबी संपत्ती आढळून आली. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर कांबळे यांनी गंगापूर पोलिसात फिर्याद दिली. याप्रकरणी गंगापूर पोलिसात अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात येऊन संशयित देशमुख यांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Zilla Parishad engineer areested in illegal property case