जिल्हा परिषदेत भाजपच्या गटनेतेपदी डॉ. आत्माराम कुंभार्डे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

नाशिक - जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी आज डॉ. आत्माराम कुंभार्डे यांची एकमताने निवड झाली. या वेळी ओझर गटातील अपक्ष सदस्य यतीन कदम यांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. यामुळे जिल्हा परिषदेत भाजपचे संख्याबळ आता 16 झाले आहे. डॉ. कुंभार्डे यांनी आज भाजपच्या गटाची जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणी केली. 

जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या भाजपच्या 15 सदस्यांची आज भाजप कार्यालयात बैठक झाली. खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, आमदार डॉ. अपूर्व हिरे, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, डॉ. विलास बच्छाव, ओझर गटातून निवडून आलेले अपक्ष कदम उपस्थित होते. त्यांनी जिल्हा परिषदेत भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. त्यांचा सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित सदस्य डॉ. कुंभार्डे, कलावती चव्हाण, धनश्री आहेर, साधना गवळी, ज्ञानेश्‍वर जगताप, सिमंतिनी कोकाटे, कन्हू गायकवाड, मीना मोरे, लता बच्छाव, बलवीरकौर गिल, समाधान हिरे, संगीता निकम, जगन्नाथ हिरे, मनीषा पवार, आशाबाई जगताप उपस्थित होत्या. सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा पक्षातर्फे सत्कार झाला. 

बैठकीत यतीन कदम यांचे स्वागत करण्याबरोबरच आत्माराम कुंभार्डे यांची भाजपच्या गटनेतेपदी एकमताने निवड झाली. या निवडीनंतर डॉ. कुंभार्डे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन भाजपचे 15 व एक सहयोगी अशा 16 जणांच्या गटाची नोंदणी केली. 

"राष्ट्रवादी'बरोबर युतीचे संकेत 
भाजपच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या बैठकीनिमित्त आज जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापन करण्याबाबतही चर्चा झाली. मुंबईच्या महापौर निवडीनंतरच नाशिक जिल्हा परिषदेतील आघाडीबाबत चित्र स्पष्ट होणार असल्याचे सांगितले जात असले, तरी अनौपचारिक चर्चेत "राष्ट्रवादी'बरोबर युती करण्याचे संकेत दिले जात होते. 

Web Title: ZP Group Leader of BJP aatmaram kumbharde