भाजप अखिलेश यादवांना मोठा धक्का देणार; काका शिवपालांना करणार थेट 'उपसभापती' I Akhilesh Yadav | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akhilesh Yadav vs Shivpal Yadav

निवडणूक निकालानंतर उत्तर प्रदेशमधील राजकारणात मोठ्या घडामोडी पहायला मिळत आहेत.

भाजप अखिलेशना मोठा धक्का देणार; काका शिवपालांना करणार थेट 'उपसभापती'

इटावा : निवडणूक निकालानंतर उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh Assembly Election) राजकारणात मोठ्या घडामोडी पहायला मिळत आहेत. त्यातच आता काका शिवपाल यादव हे अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यावर नाराज असल्याचं कळतंय. याच संधीचा फायदा घेऊन भाजप (BJP) शिवपाल यादव (Shivpal Yadav) यांना थेट विधानसभेचं उपसभापती बनवू शकतं, अशी चर्चा सध्या जोर धरु लागलीय. मात्र, शिवपाल हे पद स्वीकारण्यास तयार आहेत का? हाही मोठा प्रश्न आहे.

पीएसपी प्रमुख शिवपाल यादव यांची भाजपशी वाढती जवळीक त्यांना उत्तर प्रदेश विधानसभेच्या उपसभापतीपदावर बसवू शकते, अशी चर्चा यूपीच्या राजकीय वर्तुळात आहे. असं खरंच घडलं, तर शिवपाल त्यांचे पुतणे आणि सभागृहातील विरोधी पक्षनेते अखिलेश यादव यांच्या जवळ बसतील. म्हणजेच, उपसभापतींची जागा सभागृहातील विरोधी पक्षनेत्याच्या अगदी शेजारी आहे.

पीएसपी प्रमुख शिवपाल यादव इटावा जिल्ह्यातील जसवंतनगर विधानसभा मतदारसंघातून (Jaswantnagar Assembly constituency) सलग सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. नेहमीप्रमाणं यावेळीही शिवपाल सिंह यादव हे समाजवादी पक्षाचं चिन्ह 'सायकल' घेऊन निवडून आलेत. 10 मार्च रोजी झालेल्या मतमोजणीत समाजवादी पार्टी सत्तेपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरली. तेव्हा शिवपाल यादव यांनी त्यांचे पुतणे अखिलेश यादव यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळं त्यांचं अखिलेश यादव यांच्यापासूनचं अंतर वाढत गेलं. होळीच्या निमित्तानं मुलायम, राम गोपाल आणि अखिलेश यादव यांच्यासोबत सैफईमध्ये होळी खेळणारे शिवपाल 26 मार्चनंतर सपाच्या बैठकीला बोलावलं नसल्याचं सांगून तेथून निघून गेले. पण, 29 मार्चला बोलावल्यावर शिवपाल यांनी बैठकीला हजर राहण्याऐवजी भर्थनामध्ये भागवतांचं म्हणणं ऐकणं पसंत केलं. त्यानंतर 30 मार्च रोजी शिवपाल यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची भेट घेतली होती.