UP Election : शेतकऱ्यांना चिरडलं त्या लखीमपूरमध्ये निकाल काय लागला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lakhimpur Kheri

UP : शेतकऱ्यांना चिरडलं त्या लखीमपूरमध्ये निकाल काय लागला?

UP Assembly Election Results : उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल काल जाहीर झालेत. या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार आहे. उत्तर प्रदेशच्या या निवडणुकीत काही गोष्टींची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहेत. यापैकी एक विषय म्हणजे लखीमपूर खेरी. लखीमपूर खेरीमध्ये (Lakhimpur Kheri) गेल्या वर्षी कारने शेतकऱ्यांना चिरडल्याची घटना घडली होती.

हेही वाचा: Election Results: पाच राज्यांचे आमदार एकत्र केले तरी होत नाही काँग्रेसची सेंच्यूरी

उत्तर प्रदेशच्या पश्मिमेकडीला भागात असणाऱ्या लखीमपूरमध्ये घडलेल्या घटनेचे देशभरात गंभीर पडसाद उमटले. निघासन विधानसभेच्या अंतर्गत येणाऱ्या टिकुनिया येथे केंद्रीय मंत्र अजय मिश्रा यांचे पुत्र अजय मिश्रा यांनी आपल्या कार खाली शेतकर्‍यांना चिरडल्याचा आरोप आहे. या घटनेत काही शेतकरी आणि त्यानंतर झालेल्या हिंसाचारात भाजप कार्यकर्ते मारले गेले होते. ज्यामध्ये भाजप कार्यकर्ते आणि शेतकर्‍यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला मुख्य आरोपी असल्यानं त्याला अनेक महिने तुरुंगात काढावे लागले होते.

हेही वाचा: ''काही वर्षात काँग्रेसची ओळख जिल्हा पक्ष म्हणून होईल''

देशभरात या घटनेचे गंभीर पडसाद उमटले होते. अनेक दिवस शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. ज्या ठिकाणी ही घटना घडली ती ते ठिकाण म्हणजे टिकुनिया. हा भाग निघासन विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येतो. या जागेवर भाजपचे शशांक वर्मा यांनी मात्र जोरदार विजय मिळवला. तर समाजवादी पक्षाचे आरएस कुशवाह हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. याशिवाय बसपचे आरए उस्मानी तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

हेही वाचा: काँग्रेसने आक्रमक न होता सकारात्मक राहवे, ममता बॅनर्जी यांचा सल्ला

लखीमपूर खेरीमध्ये विधानसभेच्या एकूण आठ जागा आहेत. पालिया, निघासन, गोला, श्रीनगर, धौरहरा, लखीमपूर, कास्ता आणि मोहम्मदी. या आठही विधानसभेच्या जागा भाजपने जिंकल्या आहेत. लखीमपूर खेरी येथे चौथ्या टप्प्यात मतदान झालं. त्यावेळी 62.45 टक्के मतदान झालं होतं.

Web Title: Bjp Wins Lakhimpur Kheri In 8 Assembly Elections 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Bjplakhimpur kheri
go to top