काँग्रेसने आक्रमक न होता सकारात्मक राहवे, ममता बॅनर्जी यांचा सल्ला

सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन भाजपविरुद्ध लढा देणे आवश्यक आहे.
Mamata Banerjee
Mamata Banerjeeesakal

कोलकाता : जर काँग्रेसला वाटत असेल की सर्व राजकीय पक्ष २०२४ मधील सार्वजनिक निवडणुका एकत्रित लढावे, तर आता आक्रमक न होता सकारात्मक रहावे, असा सल्ला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी काँग्रेसला दिला आहे. त्या एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत होत्या. चार राज्यांतील विधानसभांमधील विजय हा भाजपसाठी मोठे नुकसानीचे ठरेल. २०२२ निवडणूक निकाल २०२४ मधीन निवडणुकांचा निकाल ठरवतील, हे अव्यवहार्य आहे, अशी घणाघाती टीका बॅनर्जी यांनी भाजपवर (BJP) केली आहे. ईव्हीएम यंत्रांची लूट आणि गैरमार्गाचा वापर केला गेला. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी नाराज होण्याची काही गरज नाही. ईव्हीएम यंत्रांच्या न्यायिक तपासणीसाठी त्यांनी पाठपुरावा करावा. (Mamata Banerjee Say, If Congress Wants We All Can Fight 2024 General Elections, Don't Be Aggressive)

Mamata Banerjee
चार राज्यांमध्ये पराभव होऊनही 'आप'ची लाट म्हणणे हास्यास्पद : स्मृती इराणी

यावेळी अखिलेश यादव यांच्या मतदानाची टक्केवारी २० वरुन ३७ टक्क्यांवर गेली आहे. सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन भाजपविरुद्ध लढा देणे आवश्यक आहे. काँग्रेस (Congress Party) आपली विश्वासाहर्ता गमवत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून राहू शकत नाही, असे बॅनर्जी म्हणाल्या.

Mamata Banerjee
रोजगार, विकास मुद्द्यांवर धनशक्तीचा विजय; प्रशांत भूषण यांची भाजपवर टीका

तृणमूल काँग्रेस पक्ष तीन महिन्यांपूर्वीच गोव्यात प्रवेश केला होता आणि तिने ६ टक्के मते मिळविली आहे. हे पुरेसे आहे, असे मत गोवा विधानसभा निकालावर ममता बॅनर्जी यांनी मत व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com