पराभवानंतर अखिलेश यादव ॲक्शन मोडमध्ये; चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी I Akhilesh Yadav | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akhilesh Yadav

समाजवादी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी पक्षाच्या वतीनं अधिकृत पत्र जारी केलंय.

पराभवानंतर अखिलेश यादव ॲक्शन मोडमध्ये; चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील (Uttar Pradesh Assembly Election) पराभवानंतर आता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. निवडणुकीत पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या नेत्यांना त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. विधान परिषद निवडणुकीत (Legislative Council Election) पक्षाला विरोध केल्याबद्दल समाजवादी पक्षानं (Samajwadi Party) गाझीपूरचे माजी विधानपरिषद सदस्य कैलाश सिंह यांच्यासह चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केलीय.

याशिवाय, समाजवादी पक्षानं (SP) बाबासाहेब वाहिनीचे राष्ट्रीय सचिव रमेश यादव आणि उपेंद्र यादव यांचीही पक्षातून हकालपट्टी केलीय. या सर्व नेत्यांवर विधान परिषद सदस्याच्या निवडणुकीत सपाला विरोध केल्याचा आरोप आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या सूचनेवरून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल यांनी या नेत्यांची हकालपट्टी करण्याबाबतचं पत्र जारी केलंय.

अखिलेश यांच्या सूचनेवरून कारवाई

समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल (Naresh Uttam Patel) यांनी पक्षाच्या वतीनं अधिकृत पत्र जारी केलंय. राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या सूचनेवरून ही कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी या पत्रात म्हंटलंय. सपामधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये ओडिहारचे रहिवासी कैलाश सिंह, सैदपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, तसेच गाझीपूरचे माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष विजय यादव यांचा समावेश आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीनंतर आता विधानपरिषद निवडणुकीची तयारी सुरूय. पक्षाचे आणखी नुकसान होऊ नये, म्हणून अखिलेश यादव यांनी ही कारवाई करून पक्षश्रेष्ठींना जोरदार संदेश देण्याचा प्रयत्न केलाय.