मी अनेकदा गोळीबार झेललाय; तुम्हाला घाबरत नाही; ममतांचा तिखट वार

मी अनेकदा गोळीबार झेललाय; तुम्हाला घाबरत नाही; ममतांचा तिखट वार

वाराणसी: उत्तर प्रदेशमध्ये सातव्या आणि शेवटच्या टप्प्याच्या मतदानापूर्वी प्रचारासाठी ममता बॅनर्जी थेट मोदींच्या मतदार संघामध्ये गेल्या आहेत. या प्रचारसभेमध्ये त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. येत्या 10 मार्चला यूपीसहित पाच राज्यांचं भवितव्य ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आता वाराणसीमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी समाजवादी पक्षासाठी प्रचार केला आहे. (Uttar Pradesh Assembly Election 2022)

मी अनेकदा गोळीबार झेललाय; तुम्हाला घाबरत नाही; ममतांचा तिखट वार
OBC आरक्षणाशिवाय राज्यात निवडणुका होणार नाहीत; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

यावेळी प्रचारसभेत त्यांनी भाजपबाबतचे आपले अनुभव शेअर करत जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की, परवा मी विमानतळावरून घाटाकडे जात होते. तेंव्हा मी माझी गाडी थांबवताना काही भाजप कार्यकर्त्यांना पाहिलं. ज्यांच्या मेंदूत गुंडगिरीशिवाय दुसरं काही नाहीये. त्यांनी माझ्या गाडीवर लाठ्या मारल्या आणि मला परत जाण्यास सांगितले. मग मला समजले की ते गेले आहेत. मात्र, यातून भाजपचं नुकसान होणार आहे.

पुढे त्या म्हणाल्या आहेत की, मी घाबरले नाहीये. मी काही घाबरट नाहीये. मी एक लढवय्यी आहे. मी माझ्या आयुष्यात आजवर अनेकदा झटापट आणि गोळीबार सुद्धा झेलला आहे. पण मी कधीच झुकले नाहीये. काल जेंव्हा त्यांनी मला घेरलं होतं तेंव्हा मी माझ्या कारमधून बाहेर आले आणि त्यांना सामोरी गेले. ते माझ्यासोबत काय करु शकतात, हे पाहिलं. मात्र, तेच भ्याड आहेत. (Mamata Banerjee)

मी अनेकदा गोळीबार झेललाय; तुम्हाला घाबरत नाही; ममतांचा तिखट वार
'मी काय पुतीन यांना युद्ध थांबवण्याचे निर्देश देऊ शकतो का?' - CJI

भाजपचे लोक आधी म्हणायचे की, आम्ही अच्छे दिन आणू. अच्छे दिनाच्या नावाखाली रेल्वे, एअरपोर्ट, बँक सारं काही विकून टाकत आहे. अच्छे दिनाच्या नावावर यांनी नोटबंदी करुन टाकली, असंही त्यांनी म्हटलं आहे.

वाराणसीत ममतांना काळे झेंडे

ममता बॅनर्जी आपल्या घोषित करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार बुधवारी सांयकाळी वाराणसीमध्ये गेल्या होत्या. ममतांना त्या ठिाकणी भाजपच्या विरोधाचा सामना करावा लागला होता. भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून विरोध दर्शवला. त्यांची कार एअरपोर्टवरुन दशाश्वमेध घाटाच्या दिशेने निघाली होती. घाटाजवळच काही अंतरावर भाजपचे कार्यकर्ते उभे होते. ते ममतांच्या रॅलीसमोर उभे राहिले आणि त्यांनी विरोध दर्शवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com