
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाला जोरदार झटका बसलाय.
'राजकारणातून मायावतींनी विश्रांती घ्यावी, आंबेडकरांचं स्वप्न RPI पूर्ण करेल'
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Assembly Election) अनुसूचित जातींच्या समुदायाच्या आधारे बहुजनांचं राजकारण करणाऱ्या बहुजन समाज पक्षाची कामगिरी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अतिशय वाईट राहिली. सध्याच्या कलानुसार बसपाला उत्तर प्रदेशात दोन अंकी जागादेखील गाठता आली नाही. बसपाची (BSP) आतापर्यंतची ही वाईट कामगिरी आहे. उत्तर प्रदेशची सत्ता एकहाती खेचणाऱ्या बसपाच्या कामगिरीकडं अनेकांचं लक्ष लागलं होतं. मागील लोकसभा निवडणुकीत बसपाला मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं होतं. पक्षाच्या भवितव्याच्या दृष्टीनं बसपासाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची होती. मात्र, बसपाची कामगिरी अतिशय सुमार राहिली.
बसपाच्या या वाईट कामगिरीनंतर दलित नेते आणि रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मायावतींचा (Mayawati) खरपूस समाचार घेतलाय. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाला जोरदार झटका बसलाय. प्रथमच बसपाला युपीत केवळ एक जागा जिंकता आलीय. मायावतींवर टीका करताना केंद्रीय मंत्री म्हणाले, बसपा प्रमुख मायावतींना आता विश्रांतीची गरज आहे. तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचं 'मिशन' पूर्ण करण्याची जबाबदारी आता आरपीआय (RPI) असल्याचंही आठवलेंनी सांगितलं.
हेही वाचा: निधनाआधी शंकरराव कोल्हेंनी गृहमंत्र्यांना पाठवलं होतं 'पत्र'
काल (मंगळवार) आठवलेंनी एक निवेदन जारी करत मायावतींवर जोरदार टीका केलीय. आरपीआय देशभरात बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करेल आणि उत्तर प्रदेशमध्ये बसपाला मजबूत पर्याय म्हणून उदयास येईल. हिजाबच्या उच्च न्यायालयाच्या (Karnataka High Court) निर्णयाचं केंद्रीय मंत्र्यांनी स्वागत केलंय. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबाला महत्त्व नसून संस्थांमध्ये शालेय ड्रेसचा प्रचार व्हायला हवा, असं ते म्हणाले.
हेही वाचा: लोकसभा निवडणुकीत काँग्रेस भाजपला कडवी टक्कर देणार?
दरम्यान, 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाचंही त्यांनी तोंडभरुन कौतुक केलंय. असे चित्रपट देशाला आणि समाजाला इतिहासाची जाणीव करून देतात. आपणही वेळ मिळेल, तेव्हा हा चित्रपट नक्कीच बघू, असं आठवलेंनी सांगितलं. राज्यसभा खासदार आठवले यांची सक्रियता आतापर्यंत महाराष्ट्रापुरती मर्यादित होती. परंतु, आता त्यांनी यूपीच्या राजकारणातही हस्तक्षेप करण्याचे संकेत दिलेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाचे उत्तराधिकारी असं त्यांनी अनेकदा स्वतःचं वर्णन केलंय.
Web Title: Mayawati Should Take Break From Politics Rpi Will Fulfill Ambedkar Dream Ramdas Athawale
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..