नाव न घेता PM मोदींचा हल्ला; म्हणाले, माझ्या मृत्यूसाठी प्रार्थना केली गेली

PM Narendra Modi
PM Narendra ModiPM Narendra Modi

काशी विश्वनाथ धामचे उद्घाटन होत असताना काही लोक खालच्या पातळीवर गेले होते. येथे माझ्या मृत्यूसाठी प्रार्थना केली गेली. हे पाहून खूप आनंद झाला. काशीतील लोकांचे माझ्यावर किती प्रेम आहे हे शत्रूंनाही दिसले. म्हणजे काशीची जनता मला सोडणार नाही आणि मरेपर्यंत काशीही मला सोडणार नाही. काशीची सेवा करताना माझा मृत्यू झाला तर याहून मोठे सौभाग्य काय असेल. मी भक्तांची सेवा करता करता मेलो तर त्याहून उत्तम काय होईल?, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.

बूथ विजय संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (ता. २७) बनारसला पोहोचले. यावेळी कोणाचेही नाव न घेता नरेंद्र मोदी यांनी अखिलेश यादव यांच्यावरही हल्ला चढवला. काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनासाठी नरेंद्र मोदी बनारसमध्ये आले होते. तेव्हा सपा (samajwadi Party) प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले होते की, शेवटच्या क्षणी लोकांनी काशीमध्येच रहावे. त्यावर पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) आज उत्तर दिले.

PM Narendra Modi
राणेनंतर भाजपच्या ‘या’ नेत्याने अपशब्दात मुख्यमंत्र्यांना खडसावले

पूर्वीचे सरकार कट्टर कुटुंबीयांनी चालवले होते. त्यांच्या पक्षाशी कुटुंबवाद आणि माफियावाद निगडीत आहे. सेवा आमच्या कुटुंबाशी निगडीत आहे. कोरोनाचा काळ हे त्याचे उदाहरण आहे. आमच्या लोकांनी घरोघरी औषधे आणि रेशन पोहोचवले. बनारसमध्ये किती विदेशी नागरिक अडकले. परंतु, काशीच्या जनतेने त्यांना त्रास होऊ दिला नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.

काशी ही भारताच्या संस्कृतीची प्राचीन राजधानी आहे. परंतु, पूर्वीच्या सरकारांनी बनारसच्या जनतेला विकासापासून वंचित ठेवून संकटांच्या खाईत ढकलण्याचा प्रयत्न केला. आरोग्याच्या क्षेत्रात केलेले काम मेडिकल कॉलेजच्या रूपाने दिसून येते. वैद्यकीय महाविद्यालये पूर्वीपेक्षा दुप्पट झाली आहेत. सरकारचे काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, असे बूथ कार्यकर्त्यांना नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सांगितले.

PM Narendra Modi
बिअरचे चिअर्स महागणार; जवच्या आयातीवर परिणाम होणार

प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या विकासाला प्राधान्य

महाशिवरात्रीला लाखो भाविक येणार आहे. बाहेरून येणाऱ्या भाविकांची सेवा करायची आहे. बनारसप्रमाणेच प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या विकासाला आमचे प्राधान्य आहे. येथील विकासामुळे आर्थिक विकासाला चालना मिळते. पण माफिया लोक प्रत्येक विकासाकडे जातीयवादी नजरेने पाहतात. वाराणसीतील लोकांकडून मला खूप प्रेम आणि आदर मिळाला आहे. माझ्या गैरहजेरीत तुम्ही सर्व भाजप कार्यकर्ते काम सांभाळता. तुम्ही माझ्यासाठी मुक्त विद्यापीठ आहात, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com