Beer will be expensive
Beer will be expensiveBeer will be expensive

बिअरचे चिअर्स महागणार; जवच्या आयातीवर परिणाम होणार

राजेश रामपूरकर

नागपूर : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे तेलाचा बाजार आणि सोन्याच्या बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. या युद्धाचा फटका आता बिअर व्यवसायालाही (Beer will be expensive) बसणार आहे. बिअरच्या किमती वाढणार आहेत. यामुळे आगामी दिवसात बिअर खरेदीसाठी मद्यशौकीनांना जास्त किंमत मोजावी लागणार आहे. (Beer will be expensive)

रशिया (russia) आणि युक्रेनमधून मोठ्या प्रमाणात जवची आयात होत असते. युद्धामुळे त्याच्या आयातीवर परिणाम होणार असल्याने भाववाढ अपेक्षित आहे. जगात रशियामध्ये जवाचे सर्वाधिक उत्पन्न होते. रशियात दरवर्षी १.८ कोटी टन जव धान्याचे उत्पादन होते. तर जव धान्याच्या उत्पादनात युक्रेनचा चौथा क्रमांक लागतो. युक्रेनमध्ये ९६ लाख टन जव धान्याचे उत्पादन होते. तर भारतात जवचे उत्पादन १६ ते १७ लाख टन होते. भारतात राजस्थान (rajasthan) आणि उत्तर प्रदेशमध्ये (Uttar pradesh) सर्वाधिक जवाचे उत्पादन होते. जगभरात जव धान्यापासूनच बियर (Beer will be expensive) बनवली जाते. पुरवठा कमी झाल्याने जवाचे भाव वाढतील असा अंदाजही व्यक्त होत आहे.

Beer will be expensive
राणेनंतर भाजपच्या ‘या’ नेत्याने अपशब्दात मुख्यमंत्र्यांना खडसावले

जगभरात बहुतांश ठिकाणी जव धान्यापासूनच बिअर बनवली जाते. जगभरात युक्रेनमधून १८ टक्के जव निर्यात होते. २०२१-२२ च्या तिसऱ्या या तिमाहीत ही निर्यात ६३.६ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षात सरासरी युक्रेनमधून (ukraine) जव धान्याची निर्यात १३.६ टक्क्यांनी वाढली आहे. आता युद्धामुळे जव धान्याच्या पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे बिअरयचे भाव वाढण्याची शक्यता आहे, असे एका अहवालात म्हटले आहे.

धान्याचा व्यापार अडचणीत येऊ शकतो

जगात ९० टक्के माल्टचे उत्पादन जव धान्यापासून बनते. या माल्टपासून दारू बनवली जाते. उन्हाळा पाहता अनेक कंपन्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात जव जास्त प्रमाणात विकत घेतात. आता रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध छेडले आहे. त्यात विमानतळ बंद असून नाटोनेही अजून कुठलीही भूमिका घेतलेली नाही. यामुळे जव धान्याचा व्यापार अडचणीत येऊ शकतो. त्याचा थेट परिणाम जवाच्या किमतीवर होणार असल्याचेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com