एक्झिट पोल्सवर PM मोदींनी साधला निशाणा; पाहा काय म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi_UP Election
एक्झिट पोल्सवर PM मोदींनी साधला निशाणा; पाहा काय म्हणाले...

एक्झिट पोल्सवर PM मोदींनी साधला निशाणा; पाहा काय म्हणाले...

नवी दिल्ली : देशातील पाच विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये चार राज्यांमध्ये भाजपनं घवघवीत यश मिळवलं. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी मतदानोत्तर चाचण्या अर्थात एक्झिट पोल्सवर निशाणा साधला. (PM Modi targets exit polls BJP wins four states out of five)

मोदी म्हणाले, गोव्यात भाजपनं सर्व एक्झिट पोल्सना चुकीचं ठरवलं. त्याचबरोबर भाजपनं उत्तराखंडमध्ये नवा इतिहास रचला. पहिल्यांदाच या राज्यात भाजप सगल दुसऱ्यांदा सत्तेत आला आहे.

हेही वाचा: पंतप्रधान मोदी आज पुण्यात

"मी आधीच म्हटलं होतं की, होळीला १० मार्चपासून सुरुवात होईल. हा आमच्या एनडीएच्या कार्यकर्त्यांसाठी चौथा विजय आहे. लोकशाहीच्या या उत्सवात सामिल झाल्याबद्दल आणि भाजपच्या विजयात महत्वाचं योगदान दिलेल्या सर्व मतदारांचं मी आभार मानतो. त्याचबरोबर उत्तर प्रदेशात हे पहिल्यांदाच घडलं की, मुख्यमंत्री दुसऱ्या टर्मसाठी निवडून आला आहे," असंही मोदी यावेळी म्हणाले.

Web Title: Pm Modi Targets Exit Polls Bjp Wins Four States Out Of Five

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top