ट्विट युद्ध : राजा भय्या अखिलेश यांना म्हणाले, राजकारणात इतका द्वेष चांगला नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raja Bhaiya

राजा भय्या अखिलेश यांना म्हणाले, राजकारणात इतका द्वेष चांगला नाही

प्रतापगडच्या कुंडा मतदारसंघाच्या निवडणुकीवरून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि जनसत्ता दलाचे अध्यक्ष रघुराज प्रताप सिंह ऊर्फ ​​राजा भय्या यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. एकीकडे राजा भय्या आणि सपा उमेदवार गुलशन यादव यांनी एकमेकांवर गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे मंगळवारी अखिलेश यादव आणि राजा भय्या (Raja Bhaiya) यांच्यात ट्विट युद्ध सुरू झाले. (UP Election 2022)

मंगळवारी अखिलेश यादव यांच्या ट्विटला उत्तर देताना राजा भय्या (Raja Bhaiya) म्हणाले, आदरणीय अखिलेश (akhilesh yadav) जी, तुम्ही एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ राजकारणीही आहात. वरील व्हिडिओ २०१९ च्या निवडणुकीतील हरियाणाचा आहे. ज्याला तुम्ही कुंडकुळीत सांगून निवडणूक रद्द करण्याची मागणी करीत आहात. राजकारणात इतका द्वेष चांगला नाही. त्यांनी अखिलेश यादव यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉटही शेअर केले.

कुंडामध्ये कोणत्याही पक्षाच्या अवांछित व्यक्तीकडून महिलांची मते सार्वजनिकपणे दाबली जात आहे. व्हिडिओची दखल घेत निवडणूक निरीक्षकांनी कुंडाची निवडणूक रद्द करण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे केली पाहिजे. तसेच दोषी व्यक्तीची ओळख पटवून तात्काळ अटक करावी, असे ट्विट अखिलेश यादव यांनी केले होते. प्रतापगड पोलिसांनी तपासणीनंतर व्हिडिओ (video) हरियाणातील फरीदाबाद येथे झालेल्या मागच्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित असल्याचे सांगितले. त्यानंतर अखिलेश यादव यांनी ट्विट डिलीट केले.

अलीकडे वाद चव्हाट्यावर

राजा भय्या (Raja Bhaiya) हे मुलायमसिंह यादव आणि अखिलेश (akhilesh yadav) सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. राजा भय्या आणि अखिलेश यादव यांच्यातील अंतर अलीकडच्या काळात चव्हाट्यावर आले. जेव्हा समाजवादी पक्षाने कुंडामधून एकेकाळी त्यांच्या जवळचे असलेले गुलशन यादव यांना तिकीट दिले. तेव्हापासून कुंडाच्या निवडणुकीत चुरशीची स्पर्धा होणार असल्याची चर्चा होती.