..तर योगी-मोदींनी पाण्यात बुडून मरावं; सपा नेत्याचं वादग्रस्त विधान

Narendra Modi Yogi Adityanath
Narendra Modi Yogi Adityanathesakal
Updated on
Summary

'योगी सरकारचा पापाचा घडा भरला असून जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल.'

UP Election 2022 : भाजपला सोडचिठ्ठी देऊन समाजवादी पक्षात (Samajwadi Party) दाखल झालेले माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. काल (सोमवार) अहमदाबाद बॉम्बस्फोटावर (Ahmedabad Bomb Blast) बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी समाजवादी पक्षावर टीका केली. समाजवादी पक्षाचं चिन्ह सायकल आहे. याच सायकवर दहशतवाद्यांनी अहमदाबादमध्ये बॉम्ब ठेवला होता. दहशतवादासाठी अतिरेकी सायकल (Bicycle) वापरायचे, असंही मोदी म्हणाले होते.

मोदींच्या या विधानाचा समाजवादी पक्षाकडून निषेध नोंदवला जात आहे. या वादात आता सपाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी उडी घेतलीय. मौर्य सध्या स्टार प्रचारक म्हणून सपामध्ये कार्यरत आहेत. सपाचे उमेदवार आरपी यादव यांच्या प्रचारार्थ मौर्य मैदानात उतरले आहेत. भाजप हा लबाड आणि मूर्खांचा पक्ष असून मतदारांनी सपाला मतं द्यावी, असं आवाहन त्यांनी उत्तर प्रदेशमधील (UP Election 2022) एका मतदारसंघात केलंय.

Narendra Modi Yogi Adityanath
शरद पवार काय करतील याचा अंदाज भल्याभल्यांना येत नाही'

ते पुढे म्हणाले, जो कोणी भाजपला साथ देईल, त्यांना भाजप (BJP) बाजूला करत आहे. भाजपकडून आपल्याच लोकांची कामं केली जात आहेत. त्यामुळं जनतेनं सपाला काम करण्याची संधी द्यावी. मोदी म्हणताहेत, अहमदाबाद बॉम्बस्फोटला सायकल जबाबदार आहे. मात्र, मी त्यांना सांगू इच्छितो.. जर अतिरेकी जिवंत असतील, तर दोघांनीही पाण्यात बुडून मरावं, असं थेट आव्हान त्यांनी मोदी-योगींना दिलंय. व्यापारी वर्ग भाजपच्या धोरणांना कंटाळलाय. मोदीजींना फक्त गुजरातचेच व्यापारी दिसत आहेत.सध्याचं योगी सरकार शेतकरी विरोधी आहे, तसेच ते आरक्षण विरोधीही आहेत. त्यामुळं योगी सरकारचा पापाचा घडा आता भरला असून जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com