मायावती कडाडून म्हणाल्या, समाजवादी पक्षाला मत देणं म्हणजे गुंडा राज आणणं

Mayawati
Mayawati

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये चौथ्या टप्प्यासाठीचं मतदान आज बुधवारी होत आहे. या दरम्यानच आता बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो मायावतींनी मतदान केलंय. त्या मतदानासाठी लखनऊमधील निगम नर्सरी स्कूलमध्ये आल्या होत्या. मतदान केल्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षावर हल्लाबोल केल्याचं दिसून आलं. बसपाच्या सुप्रीमो मायावती यांनी म्हटलंय की, उत्तर प्रदेशच्या लोकांनी मतदान करण्याआधीच समाजवादी पक्षाला नाकारलं आहे.

Mayawati
Nawab Malik | मोठी बातमी! ED ने नवाब मलिकांना घेतलं ताब्यात, घरावर छापे

मायावती म्हणाल्या आहेत की, समाजवादी पक्षाला मतदान करणं म्हणजे गुंडा राज, माफिया राज याला समर्थन देण्यासारखं आहे. त्यांनी म्हटलं की, मुस्लीम समाज देखील देखील समाजवादी पक्षावर नाराज आहे. ते त्यांना मत देणार नाहीत. समाजवादी सरकारच्या सत्ताकाळात झालेल्या दंगली याच त्यांचं खरं रुप आहे. समाजवादी पक्षाच्या नेत्यांचे चेहरेच सांगतात की, ते यावेळी सत्तेत येणार नाहीयेत. (Uttar Pradesh Assembly Election 2022)

Mayawati
मलिकांवरील ईडी कारवाईनंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

उत्तर प्रदेशमध्ये चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरु असून नऊ जिल्ह्यांमध्ये मतदान सुरु आहे. यामध्ये बांदा, फतेहपुर, हरदोई, लखीमपुर खीरी, लखनऊ, रायबरेली, सीतापुर, पीलीभीत आणि उन्नाव या जिल्ह्यांचा समावेश आहे. याठिकाणच्या 59 जागांवर एकूण 624 उमेदवार मैदानात आहेत. गेल्या वर्षी यामधील 50 जागांवर भाजपने जिंकल्या होत्या. तर आठ जागांवर समाजवादी पार्टी तर प्रत्येकी दोन जागांवर काँग्रेस आणि बसपचा विजय झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com