यूपीत पीडित पुरुषांसाठी मैदानात उतरलाय 'हा' पक्ष; उभारणार स्वतंत्र मंत्रालय

यूपीत पीडित पुरुषांसाठी मैदानात उतरलाय 'हा' पक्ष; उभारणार स्वतंत्र मंत्रालय
Updated on

लखनौ : ‘पुरुषांवर प्रचंड अत्याचार होत असतात. त्यामुळे आम्ही सत्तेवर आल्यास पीडित पुरुषांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी वेगळे मंत्रालय निर्माण करू,’ अशी घोषणा ‘मेरा अधिकार राष्ट्रीय दल’ (मर्द) या पक्षाने दिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये सत्ता देण्याचे आवाहन करणाऱ्या या पक्षाने राज्यातील ४०३ पैकी फक्त चारच मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत.

यूपीत पीडित पुरुषांसाठी मैदानात उतरलाय 'हा' पक्ष; उभारणार स्वतंत्र मंत्रालय
ओवैसींवर गोळीबार! अमित शहांना संसदेत द्यावं लागणार सविस्तर उत्तर

उत्तर प्रदेशमध्येही फार कोणाला माहिती नसलेल्या या पक्षाने २०१९ मध्ये लखनौ आणि वाराणसी येथून निवडणूक लढविली होती. अर्थात, दोन्ही ठिकाणी त्यांचे उमेदवार पडले. आता त्यांनी बरेली, उत्तर लखनौ, प्रयागराजमधील हंडिया आणि गोरखपूरमधील चौरी चौरा या मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. सत्तेत आल्यास पुरुषांचा आत्मसन्मान, सुरक्षा आणि इतर अधिकारांसाठी कायदे बनवू, त्यांच्यासाठी हेल्पलाइन सुरु करू, असे आश्‍वासन या पक्षाचे अध्यक्ष कपिल मोहन चौधरी यांनी दिले आहे.

यूपीत पीडित पुरुषांसाठी मैदानात उतरलाय 'हा' पक्ष; उभारणार स्वतंत्र मंत्रालय
देशात आमदार-खासदारांविरोधात 5 हजार प्रकरणे प्रलंबित : SC

पुरुषांच्या सहानुभूतीसाठी उपद्व्याप

निवडणुकीत उतरण्यामागचं कारण सांगताना चौधरी यांनी म्हटलंय की, हे सगळं अर्धी लोकसंख्या (पुरुष) असलेल्यांसोबत सहानुभूती ठेवण्यासाठी आहे. आम्ही महिलांच्या सशक्तीकरणाच्या विरोधात अजिबातच नाहीये. मात्र, जेंव्हा महिलांच्या सशक्तीकरणाच्या नावावर पुरुषांचं शोषण सुरु होतं तेंव्हा याची तातडीने गरज भासू लागते. पुढे त्यांनी म्हटलंय की, महिलांच्या तुष्टीकरणाच्या नावावर पुरुषांच्या विरोधातील दुष्प्रचार रोखण्याचं काम आम्ही करु. त्यांनी अशीही घोषणा केली आहे की, लहान मुलांना होमवर्क देण्याऐवजी गावात अथवा कॉलनी स्तरावर 'दादा-दादी पाठशाळा' बनवली जाईल. यामध्ये लहान मुले आपल्या आजी-आजोबांच्या अनुभवांमधून शिकू शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com