ओवैसींवर गोळीबार! अमित शहांना संसदेत द्यावं लागणार सविस्तर उत्तर

ओवैसींवर गोळीबार! अमित शहांना संसदेत द्यावं लागणार सविस्तर उत्तर

नवी दिल्ली : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे (एआयएमआयएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना गुरुवारी घडली आहे. या घटनेनंतर आता हा हल्ला कुणी केला, असा प्रश्न उपस्थित झाला असून त्यादृष्टीने तपास सुरु आहे. आता या हल्ल्यासंदर्भातील सविस्तर उत्तर संसदेमध्ये स्वत: अमित शहा देणार आहेत. (Union Home Minister Amit Shah)

ओवैसींवर गोळीबार! अमित शहांना संसदेत द्यावं लागणार सविस्तर उत्तर
असा झाला ओवैसींच्या गाडीवर गोळीबार; चित्तथरारक व्हिडीओ आला समोर

हापूर जिल्ह्यातून दिल्लीला परतत असताना ही घटना घडली. दरम्यान, या प्रकरणात वापरलेली शस्त्र सापडली असून एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. असदुद्दीन ओवैसी खासदार आहेत. त्यांच्यावर याप्रकारचा हल्ला होणं चिंतेची बाब आहे. या साऱ्या प्रकरणी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे येत्या सात फेब्रुवारी रोजी खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्यावर उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी उत्तर देणार आहेत.

ओवैसींवर गोळीबार! अमित शहांना संसदेत द्यावं लागणार सविस्तर उत्तर
सोशल मीडियासाठी कडक नियम; राज्यसभेत सरकारचे संकेत

नेमकं काय घडलं?

हापूर-गाझियाबाद भागातील राष्ट्रीय महामार्गावर २४ वरील छिजारसी टोल प्लाझाजवळ ओवेसी यांची गाडी आली असताना सायंकाळी सहा वाजता गोळीबाराची घटना घडली. ‘‘माझ्या गाडीवर चार गोळ्या झाडल्या गेल्या. गोळीबार करणारे तीन-चार जण होते, शस्त्रे टाकून ते सर्वजण पळून गेले. माझी गाडी पंक्चर झाली. तेव्हा दुसऱ्या गाडीतून मी पुढे रवाना झालो,’’ असे ट्विट ओवेसी यांनी घटनेनंतर केले.

“निवडणूक आयोगाने या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करावी. यात कुणाचा हात होता, याचा तपास करावा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मोदी सरकारनेही याची चौकशी करावी,” अशी मागणी ओवेसी यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com