यूपी निवडणुकीत गाजतंय मलिकांचं प्रकरण; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणतात...

यूपी निवडणुकीत गाजतंय मलिकांचं प्रकरण; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणतात...

नवी दिल्ली: उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. त्या ठिकाणी सत्ताधारी भाजप पक्ष पुन्हा एकदा आपली सत्ता टिकवू पाहतो आहे तर दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष समाजवादी पार्टी आपली सत्ता पुन्हा आणण्यासाठी सरकारवर टीकास्त्र डागतो आहे. काँग्रेस पक्षही युपीच्या मैदानात आपली गमावलेली विश्वासार्हता पुन्हा एकदा प्राप्त करण्यासाठी धडपड करतो आहे. दुसरीकडे, या विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये आता महाराष्ट्रातील घटनांचे पडसाद देखील उमटताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईबाबत आता भाजपचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी भाष्य केलंय. तसेच समाजवादी पक्षाचे प्रमुख असलेल्या अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला आहे. (Uttar Pradesh Assembly Election 2022)

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी टीका करताना म्हटलंय की, दहशतवाद्यांचे सूर समाजवाद्यांसोबत जुळलेले आहेत. नवाब मलिक जे दहशतवाद्यांकडून जमीन खरेदी करतात आणि अखिलेश यादव त्यांचं समर्थन करताना दिसून येतात. जेल आणि बेलवाले उमेदवार देखील त्यांच्या पहिल्या यादीत होते. गेल्या निवडणुकीमध्ये जे हाफ सेंच्युरी करु शकले नाहीत ते डबल सेंच्युरीच्या बाता मारत आहेत.

प्रियांका गांधी यांचा पंतप्रधानांवर घणाघात

दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की, मोदी यांना युक्रेनमध्ये काय सुरू आहे, हे माहित होते, तेथील लोकांना काय वाटत आहे हे समजते. अमेरिकेच्या अध्यक्षाला सर्दी झाल्याचेही ठाऊक होते. परंतु आपल्याच देशातील शेतकऱ्यांच्या वेदना, अडचणी कळत नव्हत्या. उत्तर प्रदेशात मोकाट जनावरांमुळे शेतकरी त्रस्त असून गेल्या पाच वर्षात त्याची भणकही त्यांना लागली नाही. आता निवडणूक आली तर शेतकऱ्यांची आठवण होत आहे, असा घणाघात कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com