UP Election 2022: अखिलेशला आता फायनल डोस द्या; भाजपाचा टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajesh Pandey

UP Election 2022: अखिलेशला आता फायनल डोस द्या; भाजपाचा टोला

सध्या उत्तरप्रदेशसह पाच राज्यांत विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी पहायला मिळत आहे. गोवा, पंजाब, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूरसह उत्तरप्रदेशमध्ये सध्या हा जल्लोष पहायला मिळत आहे. उत्तरप्रदेशमध्ये या निवडणुका ७ टप्प्यात होणार असून सध्या पाच टप्प्यातील मतदान झाले आहे. ३ मार्च ला सहाव्या टप्प्यातील मतदान होणार असून या टप्प्यात सुमारे दहा जिल्ह्यांचा सामावेश आहे. (UttarPradesh Assembly Election 2022 Updates)

उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव आणि भाजपाचे योगी आदित्यनाथ यांच्यात चांगलीच चुरशीची लढत होणार आहे. ही लढत विधानसभेच्या ४०३ जागांसाठी होणार असून स्थानिक पक्षांसह दिग्गज पक्षांनीसुद्धा कंबर कसली आहे. भाजपासोबत अपना दल आणि निशद पार्टी हे स्थानिक पक्ष असून समाजवादी, कॉंग्रेस, आप, बहुजन समाज पक्ष यांसह अनेक पक्ष रिंगणात उतरले आहेत. म्हणून ही लढत आता बहुरंगी होणार आहे. ७ व्या टप्प्यातील मतदान ६ मार्चला होणार असून १ मार्च ला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

दरम्यान नेत्यांचे एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप चालूच आहेत. सहाव्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचारादरम्यान BJP खुशीनगरच्या प्रमुखांनी समाजवादीचे नेते अखिलेश यादव यांच्यावर टोला मारला. ते प्रचारसभेच्या भाषणात बोलत होते. "तुम्हाला माहीतीये का? लसीकरणामुळे अडचणी येऊ शकतात असं म्हणत अखिलेश यांनी लस घेऊ नका म्हणून सांगितलं होतं. नंतर ते गपचूप लसीकरणासाठी गेले होते. त्यांनी लसीकरणाला 'मोदींचा टीका' & 'भाजपाचा टीका' असं म्हटलं होतं. आता ३ मार्चला त्यांना शेवटचा डोस द्या." असं त्यांनी जनतेला उद्देशून प्रचरसभेत म्हटलं आहे.

राजेश पांडे हे उत्तरप्रदेशमधील खुशीनगर येथील २०१४ साली लोकसभेसाठी निवडून आले होते. ते सध्या खुशीनगरमधील भाजपाचे प्रमुख आहेत. ३ मार्चला होणाऱ्या सहाव्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते. ७ मार्चला उत्तरप्रदेशमधील शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार असून १० मार्चला निकाल लागल्यानंतर निवडणुकांचे चित्र स्पष्ट होणार आहे.