UP Assembly Election: शेतकऱ्यांच्या रोषाचा भाजपला फटका शक्य

राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपला पहिल्या टप्प्यापेक्षा हा टप्पा अधिक आव्हानात्मक ठरण्याचा अंदाज आहे.
UP assembly Election
UP assembly ElectionSakal

लखनौ : उत्तर प्रदेशात आज दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान झाले. राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपला पहिल्या टप्प्यापेक्षा हा टप्पा अधिक आव्हानात्मक ठरण्याचा अंदाज आहे. गेल्या निवडणुकीत या टप्प्यातील ५५ जागांपैकी ४० जागा भाजपला मिळाल्या होत्या. यंदा या चित्रात बराच फरक पडेल, असा निवडणूक तज्ज्ञांचा अंदाज आहे. (UttarPradesh Assembly Election)

भाजपची थोडी पडझड होण्याच्या शक्यते मागील कारणे शोधणे फारसे अवघड नाही. या टप्प्यात असलेल्या मतदारसंघात मुस्लिम आणि शेतकऱ्यांचे प्राबल्य आहे. या गटांची मते भाजपच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत बहुजन समाज पक्षही एक प्रबळ स्पर्धक होता. यावेळी मात्र भाजप आणि सप यांच्यातच खरी लढत आहे. बसप, ‘एमआयएम’ या पक्षांकडे भाजपचीच ‘बी’ टीम म्हणून पाहिले जात असल्याने मुस्लिम मतांची विभागणी होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे ही सर्व मते सपकडे सहज वळू शकतात आणि याचाच भाजपला मोठा फटका बसू शकतो. या टप्प्यात असलेल्या ५५ मतदारसंघांपैकी सुमारे बारा मतदारसंघ संवदेनशील आणि अतिसंवेदनशील म्हणून जाहीर झाले होते.

आझम खान यांचा प्रभाव

समाजवादी पक्षाचे मोठे नेते असलेले आझम खान हे आज निवडणुकीच्या रिंगणात होते. ‘शेळी चोरी’बरोबरच आणखी काही आरोपांखाली योगी सरकारने त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करत त्यांना तुरुंगात डांबले आहे. त्यांचा मुस्लिम मतदारांवर मोठा प्रभाव असून त्याचा परिणाम कितपत दिसून येतो, हे १० मार्चला समजेल. आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला खान यांच्याविरोधातही गुन्ह्यांची नोंद असून त्यांना काही दिवसांपूर्वीच जामीन मिळाला आहे.

खपली निघाली

कृषी कायद्यांविरोधात आंदोलनानंतर शेतकऱ्यांचा भाजपविरोधातील रोष वाढला आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात मोठ्या संख्येने असलेल्या शेतकऱ्यांच्या या संतापामुळे भाजपच्या अडचणीत भर पडली आहे. त्यातच, शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रकार जिथे घडला, ते लखीमपूर खेरी हे गाव या शेतकरीबहुल पट्ट्याच्या जवळच आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या मंत्रिपुत्र आशिष मिश्रा याला नुकताच जामीनही मिळाला असल्याने जखमेवरील खपली निघाल्यासारखे झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com