UP Assembly Election: भाजपसाठी दुसरा टप्पा आव्हानात्मक

पश्चिमी उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात नऊ जिल्ह्यांत ५५ जागांवर १४ तारखेला मतदान होईल.
UP assembly Election
UP assembly ElectionSakal

बरेली : पश्चिमी उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात नऊ जिल्ह्यांत ५५ जागांवर १४ तारखेला मतदान होईल. हे नऊ जिल्हे मुस्लिमबहुल असल्याने पहिल्या टप्प्यांपेक्षा भाजपसाठी खूप आव्हानात्मक ठरणार आहेत. समाजवादी पक्षाचा येथे जोर आहे. गेल्यावेळी भाजपला या भागांत ३८ जागा मिळाल्या होत्या. त्यात आणखी घट होण्याची चिन्हे आहेत. (UttarPradesh Asembly Election)

बिजनौर, बरेली, बदायूं, सहारनपूर, अमरोहा, संभल, मुरादाबाद, रामपूर आणि शहाजहॉंनपूर या जिल्ह्यांत ५५ जागांसाठी मतदान होत आहे. गेल्यावेळी समाजवादी पक्षाला १५, तर काँग्रेसला दोन जागा मिळाल्या होत्या. या दोन्ही पक्षांनी या मतदारसंघांमधे जोर लावला आहे. या भागांतील गरिबी पाहता महागाईचा मुद्दा हा भाजपला डोकेदुखी ठरणार आहे. भाजपने उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅसचे वितरण केले. पण त्याचा सिलिंडर आता परवडेनासा झाला आहे, पेट्रोल-डिझेल भाववाढीचा मुद्दाही इथे चर्चेत आहे.

UP assembly Election
Corona Updates: पुणे जिल्ह्यात शनिवारी चार कोरोना रुग्णांचा मृत्यू

मुस्लिमबहुल भागांत ही नाराजी ऐकायला मिळत आहे. सप आणि काँग्रेस हे एकत्र लढले असते, तर या मतदारसंघात भाजपला मोठा फटका बसला असता, असे स्थानिक सांगतात. असदुद्दीन ओवैसी यांनी या 'एमआयएम'च्या माध्यमातून त्यांचे उमेदवार उभे केले . परंतु ओवैसी हे भाजपचेच काम करीत असल्याची मुस्लिम लोकांची भावना आहे. या भागांत जाट, मुस्लिम यांच्याबरोबरच कुर्मी, लोध, सैनी-मौर्य, ब्राह्मण समाजातील मतदारांचा प्रभाव आहे. त्यामुळे मतविभाजनाचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. समाजवादी पक्षाने स्वामी प्रसाद मौर्य यांना बरोबर घेतले आहे. मुस्लिम उमेदवार देत या समाजाचा पाठिंबा या पक्षांने मिळवला आहे. त्यामुळे मुस्लिमबहुल भागांत त्यांचे पारडे जड दिसून येत आहे.

आझम खान यांचा प्रभाव

आझम खान यांचा या भागात प्रभाव दिसतो. ते तुरुंगात असताना रामपूर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात दोन राजकीय राजघराण्यांमध्ये लढत आहे. आझम खान आणि नवाब घराण्यामध्ये इथे चुरस होईल. रामपूर शहर मतदारसंघातून मोहम्मद आझम खान आणि नवाब काझीम अली यांच्यात, तर जिल्ह्यातील स्वार मतदारसंघात आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला आझम आणि नवाब काझीम यांचा मुलगा हैदर अली खान निवडणूक लढवत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com