कोणाचेही नाव न घेता योगी म्हणाले, आज माफिया किड्यासारखे रेंगाळतेय

CM Yogi Adityanath
CM Yogi AdityanathCM Yogi Adityanath

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी मऊ येथे रॅली घेत असताना तुरुंगात असलेल्या मुख्तार अन्सारीच्या बहाण्याने समाजवादी पक्षाची खिल्ली उडवली. मुख्तारचे (Mukhtar Ansari) नाव न घेता मुख्यमंत्री योगी यांनी हावभावात सांगितले की, माफिया खुल्या जीपवर हात फिरवून भीती निर्माण करायचा आणि यादव आणि राजभरांना मारहाण करायचा. त्यावेळचे सपा सरकार त्या माफियांसमोर किड्यासारखे रेंगाळत होते. परंतु, आज ते माफिया किड्यासारखे रेंगाळत आहेत, असेही योगी (Yogi Adityanath) म्हणाले.

हा तोच मऊ आहे जिथे काही वर्षांपूर्वी रामलीलावेळी दंगल झाली होती. त्या दंगलीत मरण पावलेले लोक कोण होते? निर्दोष यादव, खाटीक, वर्मा व हिंदू होते. एका माफियाने उघड्या जीपवर बंदूक घेऊन शहरात भीतीचे वातावरण निर्माण केले होते. तेव्हा सपाचे सरकार होते. माफियांसमोर किड्यासारखे गप्प रेंगाळत होते. मी गोरखपूरहून आंदोलनासाठी निघालो होतो. तेव्हाही मी म्हणालो होतो की, सपा सरकार माफियांसमोर झुकले आहे. आज सपाला (Samajwadi Party) आमच्या बुलडोझरचा त्रास होत आहे, असेही योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) म्हणाले.

CM Yogi Adityanath
पतीचे उत्पन्न कमी असल्याने पत्नीने केला खून; झोपेच्या गोळ्या दिल्यानंतर...

आमच्या सरकारचा (BJP) बुलडोझर बोलतो. बड्या माफियांची बोलती थांबते. घरे जाळणारे माफिया व्यापारी प्रतिष्ठाने, यादव, खाटीक, अनुसूचित जाती, राजभर यांची हत्या करीत होते. उघड्या जीपवर बंदुका घेऊन भीतीचे वातावरण निर्माण करीत होते. आज तुम्ही तो माफिया पाहिलाच असेल की तो किड्यासारखा कसा रेंगाळतोय, असेही योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) म्हणाले.

माफियांत निवडणूक लढवण्याची हिंमत नाही

जेव्हा माफियांच्या अवैध धंद्यावर बुलडोझर चालतो, तेव्हा मऊ तमाशा पाहून टाळ्या वाजवतात. मऊच्या जनतेला सुरक्षिततेची हमी मिळायला नको का? या सरकारची भीती अशी आहे की, आज माफियांत निवडणूक लढवण्याची हिंमत नाही. आता मऊचा कोणताही नागरिक धमक्यांच्या दबावाला बळी पडत नाही, तर धमक्यांना योग्य तो धडा शिकवतो, असेही योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com