esakal | धक्कादायक! कपडे धुण्यास गेलेल्या दोन चिमुकलींचा बुडून मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

akola Two chimpanzees drowned while washing clothes

म्हाडा कॉलनीमधील चिमुकल्या मुली पद्मश्री डॉ.व्ही.बी.कोलते इंजिनिअरींग कॉलेजच्या मागे असलेल्या उघडा मारूती मंदिराजवळील खदान परिसरात कपडे धुण्यास गेल्या असता त्याठिकाणी पाण्यात बुडून दोघींचा दुर्देवी मृत्यू झाला तर एका मुलीस वाचविण्यात यश आल्याची घटना आज जुलै रोजी घडली

धक्कादायक! कपडे धुण्यास गेलेल्या दोन चिमुकलींचा बुडून मृत्यू

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मलकापूर (जि.बुलडाणा) ः म्हाडा कॉलनीमधील चिमुकल्या मुली पद्मश्री डॉ.व्ही.बी.कोलते इंजिनिअरींग कॉलेजच्या मागे असलेल्या उघडा मारूती मंदिराजवळील खदान परिसरात कपडे धुण्यास गेल्या असता त्याठिकाणी पाण्यात बुडून दोघींचा दुर्देवी मृत्यू झाला तर एका मुलीस वाचविण्यात यश आल्याची घटना आज जुलै रोजी घडली.


याबाबतची अधिक माहिती अशी की, उघडा मारूती मंदिराजवळ असलेल्या खदानवर कपडे धुण्यासाठी म्हाडा कॉलनीमधील रहिवासी कांचन बामंदे (वय वर्ष), शुभांगी दुतोंडे (वय वर्ष), नेहा वानखडे (वय वर्ष) या तिघी जणी गेल्या होत्या. दरम्यान त्यातील एका मुलीचा पाय घसल्याने ती पाण्यात पडून बुडाल्याचे तिच्या सोबतच्या दोन्ही मुलींना लक्षात येताच त्यांनी मैत्रीण बुडत असल्यचे बघून तिला वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्या दोघींचाही तोल जावून त्या पाण्यात पडल्या. सदरचा प्रकार तेथील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ पाण्यात पडलेल्या मुलींना वाचविण्याचे प्रयत्न केले. मात्र यामध्ये कांचन बामंदे व शुभांगी दुतोंडे या चिमुकल्या मुलींचा दुर्देवी मृत्यू झाला तर नेहा वानखडे हिला वाचविण्यात नागरिकांना यश आले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

घटनेची माहिती मिळताच एपीआय श्रीधर गुट्टे यांनी खदान परिसरात त्या मुलींच्या शोध कार्यासाठी सर्च ऑपरेशन राबवून दोन्ही मृतक मुलींचे शव तेथील युवकांच्या मदतीने बाहेर काढले. यावेळी समाधान ठावूैर, ईश्वर वाघ, रतन बोराखडे आदी पोलिस कर्मचारी घटनास्थळी होते. त्यानंतर पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती जाणून घेतली व मृतक मुलींचे शव हे उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. याबाबत पुढील कारवाई सुरू होती.