टाळेबंदीत तब्बल एक हजार प्राण्यांना जीवदान; नीलगाय, दुर्मिळ बगळा, मकाऊ पक्ष्यांचा समावेश

1000 animals an birds are rescue in Nagpur during Nagpur
1000 animals an birds are rescue in Nagpur during Nagpur

नागपूर ः कोरोनामुळे जाहीर झालेल्या टाळेबंदीमध्ये नागरिक घरामध्ये आणि वन्यप्राणी मुक्तपणे रस्त्यावर आल्याच्या घटना घटल्या. या कालावधीत जखमी अवस्थेत सापडलेल्या किंवा वाट चुकून वस्तीत शिरलेल्या १ हजार २१५ वन्यप्राण्यांना आणि पक्ष्यांना वन विभागाच्या सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये उपचारासाठी आणले. त्यातील ९५६ वन्यप्राणी, पक्ष्यांना उपचार आणि वैद्यकीय तपासणी करून पुन्हा निसर्गात सोडण्यात आले. त्यात

'टाळेबंदीमध्ये नागरिकांना घराबाहेर पडायला परवानगी नसल्याने रस्ते, गल्लीबोळ निर्मनुष्य झाले. त्यामुळे वन्यप्राणी, पक्षी पाण्याच्या शोधात वस्तीत शिरल्याच्या घटना घडल्या होत्या. नागरिकांकडून मदतीसाठी फोन आल्यावर स्वयंसेवकांच्या टीमने शहरातच नव्हे तर जिल्ह्यातील ग्रामीण भागांत जाऊन प्राण्यांना ताब्यात घेतले.

गरज असणाऱ्या वन्यप्राणी, पक्ष्यांवर उपचार करून त्यांना अधिवासात सोडण्यात आले. त्यात मसन्याउद, नीलगाय, ब्ल्यू आणि यलो मकाऊ या लाखो रुपये किंमत असलेल्या पक्षी , दुर्मीळ बगळा, ब्लॅक बिटन या पक्ष्यांचाही समावेश आहे. याशिवाय गेल्या वर्षभरात (२०१९ ते २०) या संस्थांनी एकूण एक १०० वन्यप्राण्यांवर उपचार करून त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले होते. त्यातुलनेत टाळेबंदीतील आकडेवारी अधिक आहे.

ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमधून उपचार घेऊन तंदुरुस्त झालेल्या वन्यप्राण्यांना व पक्षांना विविध वनक्षेत्रात नेऊन मुक्त करण्यात आले. हे सेंटर वन्यजीव संरक्षण व संवर्धनात मालाचे योगदान देत आहे. येथील पशुवैद्यक, वन कर्मचारी टाळेबंदीच्या काळात २४ बाय ७ कार्यरत होते. पकडलेल्या प्राण्याला कोणता अधिवास लागतो, तो कुठे सुरक्षित राहू शकतो याचा विचार करून प्राण्यांना सोडण्याची जागा निश्चित केली जाते. अपघातांमुळे वन्यप्राणी जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांना वेळीच उपचार मिळावेत यासाठी रेस्क्यू संस्था काम करीत आहे,' असेही राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य कुंदन हाते म्हणाले.

सेंटरची हेल्पलाइन

वस्तीत शिरलेला वन्यप्राणी, घराजवळ अथवा रस्त्यावर पडलेला जखमी अवस्थेतील प्राणी किंवा पक्षी, वनक्षेत्रांत पेटलेला वणवा आणि वन्यप्राण्यांच्या तस्करीसंदर्भात कोणतीही माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळाल्यास ०७१२- २५१५३०६ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा. ही हेल्पलाइन चोवीस तास सुरू असते असे उपवनसंरक्षक प्रभूनाथ शुक्ल यांनी सांगितले. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com