रशियातून 145 विद्यार्थी मायदेशी परतले, उर्वरित विद्यार्थी 23 जूनला नागपूरमध्ये येणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जून 2020

रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेले राज्यातील विद्यार्थी कोरोनामुळे अडकले होते.

मुंबई : रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेले राज्यातील विद्यार्थी कोरोनामुळे अडकले होते. या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी पालकांनी आमदार प्रकाश गजभिये यांना विनंती केली होती. गजभिये यांनी केलेल्या प्रयत्नास यश आले असून रशियातून 145 विद्यार्थी मायदेशी परतले आहेत. तर उर्वरित विद्यार्थी 23 जूनला नागपूर विमानतळावर येणार आहेत.

राज्यातील सुमारे 400 विद्यार्थी रशियामध्ये अडकून पडले होते. यामध्ये विदर्भातील तब्बल दोनशे विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याची माहिती मिळताच आमदार प्रकाश गजभिये यांनी या विद्यार्थीना मायदेशात परत आणण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार गुरुवारी (ता.14) 145 विद्यार्थी नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले.

BIG NEWS - सुशांत सिंग आत्महत्याप्रकरणी नजीकच्या व्यक्तीचा नोंदवला जबाब...

रशिया येथून इंडीयन एअरलाईनचे विमान हे 145 विद्यार्थी घेऊन नागपुरात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत गजभिये आणि पालकांनी यांनी केले. यावेळी उपजिल्हाधिकारी शेखर घाडगे व आरोग्य उपसंचालक कार्यालयाचे डॉक्टर सुधीर वाठ यांनी सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन सर्वांना हॉटेल सेंटर पॉईंट व हॉटेल प्राईड येथे क्वारनटाईन केले आहे. उर्वरित विद्यार्थी 23 जूनला नागपूर विमानतळावर पोहचणार आहेत.

145 students returned from Russia to india rest of the students will come on 23 june


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 145 students returned from Russia to india rest of the students will come on 23 june