नागरिकांनो! अंत्यसंस्कारासाठी २०, तर लग्नात फक्त ५० जणांना परवानगी

नीलेश डोये
Friday, 19 February 2021

अंत्यसंस्कारासाठी उपस्थित सर्व व्यक्तींनी मास्क परिधान करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. याबाबत नियमांचे पालन होत नसल्यास आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी पुन्हा एकदा कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. अंत्यसंस्कारासाठी फक्त २० जणांनाच परवानगी असणार आहे. लग्न समारंभात फक्त ५० जणांना परवानगी असणार आहे. नियमांचे पालन न केल्यास हॉल, लॉन मालकास जबाबदार ठरवून लायसन्स रद्द करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी दिले. 

हेही वाचा - प्रफुल्ल पटेलांच्या महाविद्यालयाला न्यायालयाचा दणका, एका आठवड्यात ५ कोटी भरण्याचे आदेश

अंत्यसंस्कारासाठी उपस्थित सर्व व्यक्तींनी मास्क परिधान करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. याबाबत नियमांचे पालन होत नसल्यास आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. मास्कचा वापर न करणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करावी होईल. विविध सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा व इतर सर्वच प्रकारच्या व्यक्तींच्या एकत्रित येण्यावर प्रतिबंध करण्यात आले आहे. 
गृहविलगीकरणात असलेले कोरोना रुग्ण बाहेर फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. खासगी डॉक्टरांकडे आजारी रुग्ण आढळल्यास नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास किंवा शासकीय वैद्यकीय रुग्णालय, नियंत्रण कक्ष येथे माहिती देणे आवश्यक आहे. माहिती न देणारे रुणालये कारवाईस पात्र ठरतील. रेस्टॉरंट, हॉटेल, खाद्यगृह हे ५० टक्के क्षमतेने सुरू करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे होम आयसोलेशनची सोय नाही, त्यांच्यासाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. कंटोन्मेंट झोनमधून अवागमन होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली. कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगवर भर देऊन चाचणी किमान तिप्पट करण्याचे निर्देश त्यांनी दिले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 20 people for funeral and 50 for marriage allowed due to corona in nagpur