esakal | नागपुरात कोरोना मृतांनी गाठला अडीच हजारांचा आकडा; आज नव्याने ४८५ बाधित 
sakal

बोलून बातमी शोधा

2500 people no more due to corona in nagpur

नागपूर जिल्ह्यात कोरोनावाढीचा वेग वाढत असून, आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्यांपेक्षा दुप्पट कोरोनाबाधित आढळून येत होते. मात्र कोरोनात वाढ होत असताना पाचव्या दिवशी सुमारे तीन पट वाढ झाल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसून आले.

नागपुरात कोरोना मृतांनी गाठला अडीच हजारांचा आकडा; आज नव्याने ४८५ बाधित 

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर ः लॉकडाउनच्या काळात कोरोना नियंत्रणात होता. लॉकडाउनंतर कोरोना वाढला. नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली. प्रशासन हतबल झाले. ऑक्टोबरमध्ये कोरोनाबाधितांसह मृत्यूच्या संख्येतही घट झाली आणि कोरोना संपल्याची मानसिकता नागरिकांनी तयार केली. सणासुदीला गर्दी झाली आणि पुन्हा नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोनाने डोके वर काढले. जिल्ह्यात ४८५ नवीन बाधितांची नोंद झाली. २४ तासांमध्ये ८ जण दगावल्याने मृत्यूसंख्या ३ हजार ५९४ वर पोहचली. शहरातील मृतांचा आकडा अडीच हजार झाला. तर ग्रामीण भागात ६१५ मृत्यूंची नोंद झाली.

नागपूर जिल्ह्यात कोरोनावाढीचा वेग वाढत असून, आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्यांपेक्षा दुप्पट कोरोनाबाधित आढळून येत होते. मात्र कोरोनात वाढ होत असताना पाचव्या दिवशी सुमारे तीन पट वाढ झाल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसून आले. जिल्ह्यात रविवारी (ता.२२) अवघे १८६ कोरोनाबाधित बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात झालेल्या ८ मृत्यूपैकी ४ मृत्यू शहरातील तर ३ मृत्यू ग्रामीण भागातील आहेत. 

जाणून घ्या - स्पर्श विरहित दर्शन व्यवस्थेचा शेगाव पॅटर्न, श्री दर्शन सुरू झाल्याने भाविकांमध्ये आनंद

एक मृत्यू जिल्ह्याबाहेरचा आहे. नागपूरातील ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात गेल्या सहा दिवसांपासून कोरोना बाधित रुग्ण वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. आरविवारी शहरात ४१६, ग्रामीण भागात ६८ रुग्णांची नोंद झाली. तर जिल्हाबाहेरील १ रुग्ण असल्याचे नोंद जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात नोंदविण्यात आली. ११ मार्च ते २२ नोव्हेंबर या कालावधीत एकूण १ लाख ८ हजार ८४८ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील कोरोना बाधितांची संख्या ८५ हजार ९४५ आहे. तर ग्रामीण २२ हजार २४२ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्हाबाहेरील ६६१ रुग्ण रेफर करण्यात आले.

सक्रिय कोरोनाबाधितांमध्ये वाढ

दिवाळीनंतर दर दिवसाला नवीन कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात ३ हजारावर आलेली सक्रीय कोरोना बाधित रुग्णांची रविवारी संख्या ४ हजार पार झाली आहे. ही बाब चिंताजनक आहे. शहरातील ३ हजार ५१० तर ग्रामीणचे ५४९ रुग्णांचा या बाधितांमध्ये समावेश आहे. त्यातील ९८३ गंभीर संवर्गातील रुग्णांवर विविध रुग्णालयांत तर ३ हजार ९१ बाधितांवर गृह विलगिकरणात उपचार सुरू आहेत. नवीन ४८५ बाधितांवर रविवारी संध्याकाळी उपचाराची प्रक्रिया सुरू होती.

कोरोनामुक्तांचा टक्का घसरला

रविवारी १८६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यात शहरातील १४५ तर ग्रामीण भागातील ४१ जणांचा समावेश आहे. शहरातील कोरोनामुक्तांची संख्या ७९ हजार ९३५ आहे. तर ग्रामीण भागातीवल २१ हजार २६० अशी एकूण १ लाख १ हजार १९५ वर पोहचली आहे. विशेष असे की, शहरात शनिवारी ६ हजार २९२ चाचण्या झाल्यानंतर ३६३ कोरोनाबाधित आढळले. तर रविवारी ५ हजार ९८१ चाचण्या झाल्यानंतर ४८५ जणांना बाधा झाली. यामुलेच आजपर्यंतच्या बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांचे प्रमाण ९२.९७ टक्केवर आले आहे.

क्लिक करा - ह्रदयद्रावक! चारित्र्यावर संशय; पोटात चार महिन्याचे बाळ असतानाही पूनमने गळफास लावून केली आत्महत्या

असे आहेत मृत्यू
-मेडिकलमधील मृत्यू ः १४०६
-मेयोतील मृत्यू ः १२५६
-खासगी रुग्णालयातील मृत्यू ः ९०८
-एम्स मधील मृत्यू ः २०

संपादन - अथर्व महांकाळ