esakal | उपराजधानीतील २९ अधिकारी बनले निरीक्षक; राज्य शासनाने दिली पदोन्नती

बोलून बातमी शोधा

29 officers from Nagpur became inspectors Promotion given by the State Government}

राज्यातील ४३८ एपीआयच्या जागा रिक्त झाल्यामुळे पीएसआय अधिकाऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आता त्यांनाही लवकरच पदोन्नती मिळणार आहे. पदोन्नतीच्या यादीची प्रतीक्षा पीएसआय करीत आहेत.

उपराजधानीतील २९ अधिकारी बनले निरीक्षक; राज्य शासनाने दिली पदोन्नती
sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : राज्य शासनाने मंगळवारी राज्यातील ४३८ सहायक पोलिस निरीक्षकांना पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती देऊन बदल्या केल्या आहेत. त्यात नागपुरातील २९ अधिकाऱ्‍यांचा समावेश आहे. या पदोन्नतीमुळे आता पीएसआय अधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

नागपूर शहरातील अरविंद घोडके, सतीश महल्ले, शिवाजी भांडवलकर, राखी गेडाम, अमर काळंगे, संजय परदेशी, पंकज धाडगे, विनायक पाटील, सचिन शिर्के या सर्व पोलिस अधिकाऱ्यांना ‘लॉटरी’ लागली असून, त्यांची बदली स्वप्नवत असलेले शहर मुंबईत झाली आहे. दिनेश लबडे, विशाल काळे, मंगेश काळे, नरेंद्र निस्वादे, रवी नागोसे, भीमा नरके, अमोल काचोरे, सचिन पवार या सर्व अधिकाऱ्यांना ‘डबल धमाका ऑफर’ मिळाली असून, त्यांना पुन्हा पदोन्नतीसह नागपूर शहरात पोलिस निरीक्षक म्हणून बदली मिळाली आहे.

दुचाकीवर आलेल्या चौघांनी मुलांना नेले पडक्या विहिरीकडे तर मुलींना दूर नेत केले अश्‍लील चाळे

युनूस मुलानी यांची (पिंपरी चिंचवड), बयाजीराव कुरळे (पीटीएस तुरची), विश्वास भास्कर (दविप), गजेंद्र राऊत (विसुवि), लोहमार्ग नागपूरचे सचिन म्हेत्रे (गोंदिया), समाधान पवार (मुंबई शहर), नागपूर ग्रामीणचे विकास कानपिल्लेवार (वाचक लोहमार्ग नागपूर), प्रवीण नाचणकर (यवतमाळ), गौरव गावंडे (गडचिरोली), श्याम गव्हाणे (गडचिरोली), विशेष सुरक्षा विभागाचे महेश मेश्राम (गडचिरोली), पीटीएस नागपूरचे श्याम आपटे (मीरा भाईंदर) आणि राज्य गुप्तवार्ता विभागाच्या अमिता जयपूरकर यांची नागपूर शहरात बदली करण्यात आली.

तर नागपुरातून नुकतीच बदली झालेले पोलिस अधिकारी दादाराम करांडे, सुदर्शन गायकवाड, किरण चौगुले, किरण रातकर, अनंत भंडे, शीतल माल्टे, संदीप मोरे, पुरुषोत्तम अहिरकर, राजेंद्र पाटील, सागर निकम यांचाही पदोन्नतीत समावेश आहे.

अधिक माहितीसाठी - ...तर २६ फेब्रुवारीपासून किमान दहा दिवसांचा लॉकडाऊन

आनंद गगनात मावेनासा

राज्यातील ४३८ एपीआयच्या जागा रिक्त झाल्यामुळे पीएसआय अधिकाऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आता त्यांनाही लवकरच पदोन्नती मिळणार आहे. पदोन्नतीच्या यादीची प्रतीक्षा पीएसआय करीत आहेत. तर दुसरीकडे राज्यात चार हजार पोलिस उपनिरीक्षकांची पदे रिक्त असूनही २०१३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना पीएसआय म्हणून पदोन्नती दिली जात नसल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.