नागपुरात तब्बल ३६९० गावांची पैसेवारी ५०पेक्षा कमी, महसूल विभागाकडून अंतिम आकडा जाहीर

3690 villages affected by drought in nagpur
3690 villages affected by drought in nagpur

नागपूर : नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमधील ३६९० गावांची पैसेवारी ५०पेक्षा कमी दर्शविण्यात आली आहे. वर्धा जिल्‍ह्यातील सर्वात गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे. 

शेतकऱ्यांवरील संकट काही कमी होताना दिसत नाही. खरीप हंगामात कापूस चांगला होतो, तर सोयाबीन होत नाही. दोन्हीचे पीक चांगले झाले, तर भाव मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांना फारसा फायदा होत नाही. यावर्षी अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले. नागपूर विभागातील चार जिल्ह्यात पूर आला. केंद्राच्या पथकाकडून दोनदा नुकसानीची पाहणी झाली. पथकाने नुकसान झाल्याचे मान्य केले. प्रशासनाकडून नुकसान भरपाईसाठी तयार करण्यात आलेला आराखडा योग्य नसल्याने पुन्हा पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या.

नुकतेच महसूल प्रशासनाकडून खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली. यानुसार नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमधील ८४४७ गावांपैकी ३६९० गावांमधील पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे. यात सर्वाधिक १५११ गाव चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. विशेष म्हणजे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. वर्धा जिल्ह्यातील सर्व गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे, तर सर्वात कमी २१ गाव हे गोंदिया जिल्ह्यातील आहेत. नागपूर जिल्ह्यातील २८ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी दर्शविण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील गावांची पैसेवारी -

जिल्हा गावांची संख्या ५० पेक्षा कमी पैसेवारी
नागपूर १७८९ २८ 
चंद्रपूर १७८८ १५११ 
गडचिरोली १४९३ १५६ 
वर्धा १३३८ १३३८ 
भंडारा ८४४ ६३६ 
गोंदिया ९२० २१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com