esakal | हृदयद्रावक! खेळता-खेळता स्वयंपाकघरात पोहोचली, आई गंSSS ओरडली अन् सोडला जीव
sakal

बोलून बातमी शोधा

4 years daughters died due to hot water in nagpur

सुनील मोहनलाल उईके हे कुटुंबासह हिंगणा रोडवरील भीमनगरात राहतात. ते खासगी काम करतात. त्यांच्या पत्नीने ३ जानेवारीला सकाळी सहा वाजता शेगडीवर पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते.

हृदयद्रावक! खेळता-खेळता स्वयंपाकघरात पोहोचली, आई गंSSS ओरडली अन् सोडला जीव

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : आंघोळीसाठी पाणी गरम करीत असताना चार वर्षीय चिमुकली खेळताना उकळत्या पाण्याच्या भांड्यावर पडली. यामध्ये भाजून चिमुकलीचा अंत झाला. ही दुर्दैवी घटना एमआयडीसीतील भीमनगरात उघडकीस आली. सोनाक्षी सुनील उईके, असे मृत्यू पावलेल्या चिमुकलीचे नाव आहे.

हेही वाचा - वाघ मालकाला नेत होता ओढत, पण कुत्र्यानं केलेलं कृत्य पाहून मृत्यूच्या दारात असलेला मालकही झाला...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील मोहनलाल उईके हे कुटुंबासह हिंगणा रोडवरील भीमनगरात राहतात. ते खासगी काम करतात. त्यांच्या पत्नीने ३ जानेवारीला सकाळी सहा वाजता शेगडीवर पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते. त्यांची एकुलती एक चार वर्षांची मुलगी सोनाक्षी ही घरात खेळत होती. खेळताना ती शेगडीजवळ पोहोचली. शेगडीजवळील खिडकीत असलेली खेळणी काढण्याचा प्रयत्न सोनाक्षी करीत होती. ती प्लास्टिकचा डब्यावर चढली. तिचा पाय घसरला. त्यामुळे ती थेट उकळत्या पाण्याच्या भांड्यावर पडली. या अपघातात सोनाक्षी होरपळली. पडल्याचा आवाज ऐकून तिच्या आईने घरात धाव घेतली. लगेच सोनाक्षीला लता मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान १० जानेवारीला सोनाक्षीचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

हेही वाचा - भंडारा रुग्णालय आग : शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांबाबत समोर आली धक्कादायक माहिती