ब्रेकिंग नागपूर ग्रामीण : पश्‍चिम बंगालमधून आणलेले 42 मजूर, 27 निघाले पॉझिटिव्ह, मग उडाली धावपळ ...

गुमगाव :  हिंगणा तालुक्‍यातील गुमगाव येथे पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्यानंतर परिसर सील करताना प्रशासकीय कर्मचारी व अधिकारी.
गुमगाव : हिंगणा तालुक्‍यातील गुमगाव येथे पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्यानंतर परिसर सील करताना प्रशासकीय कर्मचारी व अधिकारी.

हिंगणा (जि.नागपूर) : औद्योगिक क्षेत्र असलेला हिंगणा तालुका कोरोनाचा "हॉटस्पॉट' झाला आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी जिल्हा प्रशासनाचे कुठलेही नियंत्रण नसल्याने साईबाबा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पोही येथील सिस्कॉन कंपनीत पश्‍चिम बंगालमधून आणलेले 27 मजूर कोरोनाबाधित आढळून आल्याची घटना मंगळवारी (ता.14) उघडकीस आली. तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा129च्यावर पोहोचला आहे.

अधिक वाचा : फायनन्स कंपन्यांकडून छळ,ऑटोचालकांनी जिल्हाधिका-यांकडे केली "ही' मागणी....

129 चा टप्पा तालुक्‍यात पार
जिल्ह्यात हिंगणा तालुका कोरोनाच्या बाबतीत आघाडीवर आहे. हिंगणा तालुक्‍यात बुटीबोरी मिहान व हिंगणा एमआयडीसी परिसर येतो. लॉकडाऊननंतर उद्योगांना जिल्हा प्रशासनाने उद्योग सुरू करण्यासाठी परवाणगी दिली. उद्योग सुरू करताना निर्बंधही लावण्यात आले. या नियमाची अंमलबजावणी उद्योग व्यवस्थापन करीत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. दोन दिवसापूर्वी इंडोरमा कंपनीत एका ठेकेदाराने बिहारमधून मजूर आणले होते. अकरा मजूरांपैकी एक कोरोनबाधीत आढळून आला. हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा सालेदाभा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पोही गावातील सिस्कॉन कंपनीत काम करण्यासाठी पश्‍चिम बंगालमधील एका ठेकेदाराने42 मजूर एका गाडीत कोंबून आणले. याची माहिती तालुका आरोग्य विभागाला लागली.

अधिक वाचा : काम सुरू, रस्ता बंद आहे, मात्र आजकाल कुत्रंही तिकडे फिरकत नाही, काय आहे गोम...

सिस्कॉन कंपनीवर गुन्हा का नाही?
या सर्व मजुरांची तपासणी करण्यात आली. यातील 27 मजूर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. इतर मजुरांना "होमक्वारंटाइन' करण्यात आले आहे. पश्‍चिम बंगालमधून नागपुरात येण्यासाठी जवळपास अडीच दिवसाचा अवधी लागतो. एका वाहनात 42 मजुरांना ठेकेदाराने आणले. परराज्यातून मजूर आणत असताना कोणत्याही प्रशासनाने या वाहनांची चौकशी केली नाही, का असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्य सरकारची पोलिस यंत्रणाही आता चारचाकी वाहनांना कोण येत आहे, याची साधी चौकशी करीत नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याव्यतिरिक्त गुमगाव येथे एक व राजीवनगर येथे एक असे दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे आता तालुक्‍याची कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या129 वर पोहोचली आहे. तालुका आरोग्य विभाग सज्ज असल्यामुळे कोरोना बाधितांचे प्रकरण उघडकीस येत आहे. एवढे मात्र निश्‍चित.

अधिक वाचा :  पावसाळा सुरू झाला...तुम्हाला माहित आहे का? कोणता पाउस मानला जातो हानीकारक

इंडस्ट्रीज ठरत आहे कोरोनाचा ब्लास्ट?
बुट्टीबोरी, हिंगणा एमआयडीसी व मिहान प्रकल्पातील उद्योग आता कोरोना ब्लास्ट ठरणार तर नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे. उद्योगात परराज्यातून परस्पर मजूर मोठ्या प्रमाणात जिल्हा प्रशासनाची परवानगी न घेता आणले जात आहेत. यातील मजूर मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित असल्याचे आढळून येत आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे उद्योगासंदर्भात कारवाई करताना पुढे धजावत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. उद्योगांना जिल्हा प्रशासनाकडून अभय मिळत असल्याने कोरोना वाहक आता इंडस्ट्रीज ठरत आहे. यावर आता विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. अन्यथा कोरोनाचा मोठा "ब्लास्ट' या इंडस्ट्रीमध्ये होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

पोलिस प्रशासनाची भूमिका संशयास्पद?
बिहार व पश्‍चिम बंगाल राज्यातून मोठ्या प्रमाणात मजूर वाहनात कोंबून आणत आहेत. कोरोनाबाधित रुग्ण वाहनातून परराज्यातून येत असताना पोलिस प्रशासन या वाहनांना सरसकट जिल्ह्यामध्ये प्रवेश देत असल्याचे निदर्शनास येत आहे. वाहतूक विभाग अशा वाहनांची चौकशी करीत नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय, ग्रामीण पोलिस अधीक्षक राकेश ओला, वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त विक्रम साळी या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा प्रकरणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

संपादन : विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com