अजबच... ट्रकने पाठवला लाखांचा माल; परंतु पोहोचला रिकामा ट्रक, काय झाले मध्ये... 

45 lakh tea leaves, spice no found, driver also left the truck
45 lakh tea leaves, spice no found, driver also left the truck

नागपूर :  ट्रकमधून पाठविलेला ताजा मसाला आणि चहापत्ती अचानक लंपास झाली. ट्रक मध्येच सोडून चालकही पसार आहे. पारडी हद्दीत रिकामा ट्रक आढळून आला असून, या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईच्या डोंबिवली पूर्व येथील रहिवासी योगेश शर्मा (२५) याचा एच. आर. गोल्डन ट्रान्सपोर्ट नावाने ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. मालवाहतुकीसाठी त्याच्याकडे कंटेनर आहे. २५ जून रोजी कोलकाता येथील शिवश्याम गुड्स कार्गामुव्हरचे मालक रोशनलाल शर्मा यांनी योगेशला फोन करून नागपूरच्या रितको लॉजीस्टिक लिमिटेड यांचा माल पाठवायचा असल्याची बतावणी केली. मालवाहतुकीचा सौदा निश्चित झाल्यानंतर गाडीमध्ये एकूण ४५ लाख ४२ हजार ४६७ रुपये किमतीचा १७ हजार ९९० किलो ताजा मसाला आणि रेडलेबल चहाची पाकिटे भरण्यात आली होती.

ट्रक घेऊन चालक बलवीर कोलकाताहून नागपूरकडे निघाला. सुमारे २०० किमी अंतर कापल्यानंतर बलवीरने ३१ जुलैला योगेशला फोन करून मोहमद मैफुज नावाचा चालक पुढे वाहन घेऊन येणार असल्याची माहिती दिली. योगेशने ४ ऑगस्टपर्यंत वाट बघितली; पण चालकाचा फोन आला नाही. लोकेशन चौकशी केली असता ट्रक पारडीतील महालक्ष्मी पेट्रोल पंप परिसरात असल्याचे समजले. योगेशने मैफुजला फोन केला; पण तो बंद होता. योगेश स्वतः नागपूरला आला. ट्रकमध्ये कोणताही माल किंवा चालक नव्हता. योगेश यांनी पारडी ठाण्यात तक्रार दिली.
 

सव्वा लाखाची सुपारी, ६० हजारांचा तांदूळ चोरी


नागपूर ः रोड लाइनचे दुकान व शेजारचे गोदाम फोडून चोरट्याने सव्वा लाखाची सुपारी व ६० हजारांचा तांदूळ चोरून नेला. शनिवारी साकळी लकडगंज हद्दीत ही घटना उघडकीस आली. शांतीनगरातील रहिवासी अश्विन दुबे (३७) यांचे लकडगंज हद्दीत निखारे कॉम्प्लेक्समध्ये पंकज रोड लाइन नावाने व्यवसाय आहे. त्यांच्या शेजारीच संजय निखारे यांच्या मालकीचे धान्याचे गोडाउन आहे. शुक्रवारी रात्रीनंतर चोरट्याने सुपारीचे १ लाख ३० हजार रुपये किमतीचे कट्टे आणि गोदामातून ५९ हजार ६०० रुपये किमतीचे तांदळाचे कट्टे चोरून नेले. दुबे यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com